शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Video: पिंपरीत तरुणाला जमिनीवरची बिस्किटे खायला लावणाऱ्या 'भाईंची' मुंडन करून काढली धिंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 21:12 IST

तू मला शिव्या का दिल्या, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणून तरूणाला मारहाण केली. तसेच जमिनीवर बिस्किटे टाकून ती खाण्यास भाग पाडले होते

पिंपरी : तू मला शिव्या का दिल्या, मी या एरियाचा भाई आहे, असे म्हणून तरूणाला मारहाण केली. तसेच जमिनीवर बिस्किटे टाकून ती खाण्यास भाग पाडले. थेरगाव येथील गणेशनगर येथे मंगळवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला होता. याप्रकरणातील ‘भाई’ दोन साथीदार आरोपींना अटक करून वाकड पोलिसांनी त्यांचे मुंडन करून रविवारी (दि. ३०) त्यांची गणेशनगर परिसरातून धिंड काढली. 

अजित उर्फ आदित्य सुनील काटे (वय २०, रा. ताथवडे), प्रकाश भिवा इंगोले (वय २१, रा. काळाखडक, वाकड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गंग्या उर्फ रोहन वाघमारे (रा. थेरगाव), प्रशांत आठवले (रा. शिवकाॅलनी, गणेशनगर, थेरगाव), व तीन अल्पवयीन मुले यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील अल्पवयीन तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी २० वर्षीय तरूणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहन याने फिर्यादी तरूणाला मोबाईलवर कॉल करून शिवीगाळ केली आणि भेटण्यास बोलविले. त्यानुसार, तरूण मंगळवारी (दि. २५) रात्री साडेदहाच्या सुमारास गेला. तू मला शिव्या का दिल्या, मी या एरियाचा भाई आहे, माझ्या नादी कोणी लागले तर मी कोणाला सोडणार नाही, अशी धमकी आरोपी रोहनने दिली. तसेच फिर्यादी तरूणाला कमरेच्या बेल्टने मारहाण करत जमीनीवर टाकलेली बिस्किटे खाण्यास भाग पाडले. इतर आरोपींनीही तरूणाला शिवीगाळ करत मारहाण केली. यामध्ये फिर्यादी तरुण जखमी झाला.

तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी काटे आणि इंगोले यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे मुंडन केले. तसेच तपासकामी त्यांना रविवारी गणेशनगर परिसरात नेले. आरोपींची ही धिंड पाहण्यासाठी परिसरात गर्दी झाली होती.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCrime Newsगुन्हेगारी