शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

निघोजे येथे हातभट्टीवर पिंपरी पोलिसांचा छापा; आठ लाखांचे साहित्य जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 16:48 IST

इंद्रायणी नदीकाठी आरोपी गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पिंपरी : गावठी हातभट्टीवर छापा टाकून पोलिसांनी दारु, कच्चे रसायन, चारचाकी वाहन, मोबाइल, असा एकूण आठ लाख १३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली.

फकिर हसन पटेल (वय ३६, पद्मावती झोपडपट्टी, कात्रज), दीपक मधुकर करे (वय २३, रा. निराधार नगर, पिंपरी, सध्या रा. शांती काॅलनी, काळेवाडी), नागेश जगन्नाथ सूर्यवंशी (वय २४, रा. निराधारनगर, पिंपरी), असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. निघोजे गावच्या हद्दीत इंद्रायणी नदीकाठीआरोपी दारुची भट्टी लावून गावठी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार हातभट्टीवर छापा टाकला. त्यावेळी आरोपी दारू तयार करून वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून आठ हजारांची रोकड, ७४ हजार ७५० रुपयांची हातभट्टीची दारू, दारूचे चार लाख ५० हजारांचे कच्चे रसायन, दोन लाख ७० हजार रुपयांची वाहने, तसेच १० हजार ८०० रुपयांचे मोबाइल असा एकूण आठ लाख १३ हजार ५५० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे, सहायक फाैजदार विजय कांबळे, पोलीस कर्मचारी सुनील शिरसाट, अनिल महाजन, भगवंता मुठे, नितीन लोंढे, अमोलशिंदे, वैष्णवी गावडे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, योगेश तिडके, राजेश कोकाटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक