शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी पोलीस आयुक्तालयाला कामगार दिनाचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 14:24 IST

पिंपरी-चिंचवड शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची सातत्याने मागणी करण्यात येत होती.

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पालिकेत नव्याने आजूबाजूच्या गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे शहरातली सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर मोशी येथील नियोजित न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीही मंजूर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालया संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार १ मे रोजी आयुक्तालय सुरू करण्यात येणार आहे . मोशी येथील नियोजित न्यायालयाच्या इमारतीसाठी निधीही मंजूर झाला आहे, असे आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ’’स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासंदर्भात तारीख पे तारीख मिळत असून, मंजुरी मिळूनही प्रत्यक्षात कामकाज कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता आहे. या विषयीच्या प्रश्नावर जगताप म्हणाले, ‘‘पोलीस आयुक्तालयाचा विषय मंजूर झाल्यानंतर संबंधित विभागाकडे पाठविला होता. कामगारदिनी आयुक्तालय सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे.’’  ‘‘महापालिकेत सत्ताधाऱ्यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे. पहिले वर्ष शिकण्याचे होते. काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करूनच पुढे वाटचाल केली जाईल. चूक केलेल्या पदाधिकाऱ्यांवर गरज पडल्यास कडक कारवाई करण्यात येईल.कुणालाही पाठीशी घालणार नाही . स्थायी समितीमध्ये दर वर्षी ११ नगरसेवकांना संधी देण्यामागचा उद्देश काय, या प्रश्नावर जगताप म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार ही पद्धत सुरू केली आहे. त्यामुळे अधिक सदस्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.’’ पिंपरी-चिंचवडला मंत्रिपद या चर्चेवर जगताप म्हणाले, ‘‘विधानसभेचा पाच वर्षांचा कालावधी संपण्यास अद्याप सव्वा वर्ष शिल्लक आहे. शहराला मंत्रिपद मिळू शकते. मंत्रिपदाचा अडसर शहरातील महामंडळ व प्राधिकरण समितीसाठी नाही. शिल्लक पदांचे लवकरच वाटप केले जाईल. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या २० लाखांच्या पुढे गेली आहे. पुण्याचे उपनगर असलेल्या या शहराची ओळख औद्योगिक नगरी अशी निर्माण झाली आहे. त्यात पालिकेत नव्याने आजूबाजूच्या गावांचा समावेश करण्यात आल्यामुळे शहरातली सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची सातत्याने मागणी करण्यात येत होती. त्यावर लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

टॅग्स :PuneपुणेLakshman Jagtapलक्ष्मण जगतापDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिस