शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri News : हॅलो, कोरोना महामारीत फसवणूक, पिळवणूक होतेय? डायल करा पोलिसांचा हेल्पलाइन क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 22:54 IST

कोरोना महामारीचा गैरफायदा घेत नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे.

पिंपरी : कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र या समस्यांची सोडवणूक कशी करता येईल? यासाठी मदत कशी व कुणाची घेता येईल? हा प्रश्न आहे. यासाठी पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या संकल्पनेतून तसेच महासेतू सोल्युशन्स एलएलपी, ग्लोबल हयुमन ऑरगनायझेशन यांच्या समन्वयातून ‘पोलीस सॅमरिटन’ ही हेल्पलाइन शनिवारपासून (दि. १५) कार्यान्वित करण्यात येणार आहे.

पिंपरी - चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिक त्यांच्या समस्यांबाबत हेल्पलाइनवर फोन करू शकतात. कोविड सुसंगत आचरण कसे असावे? कोविड पॉझिटिव्ह असताना रुग्ण घराबाहेर वावरत असेल. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसेल, वेळेची मर्यादा न पाळता परवानगी नसलेली दुकाने, हॉटेल, आस्थापना सुरू असतील, अशा बाबतीत नागरिक हेल्पलाइनवर तक्रार नोंदवू शकतात.

कोरोना महामारीचा गैरफायदा घेत नागरिकांची पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे. रुग्णवाहिका चालक अवाजवी दर आकारत असतील. रेमडेसिविर किंवा इतर औषधांचा काळाबाजार होत असेल, कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अवाजवी पैशांची मागणी होत असेल, आंतरजिल्हा / आंतरराज्यप्रवासासाठी बनावट पास व बनावट कोरोना अहवाल बनवले जात असल्यास हेल्पलाइनवर तक्रार नोंदवता येणार आहे. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 

संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे होम क्वारंटाईन असल्यास औषध, जेवण, भाजीपाला याची आवश्यकता असेल, तसेच कोरोनामुळे कोणतेही लहान मूल अनाथ झाले असेल आणि त्याची जबाबदारी सांभाळण्यास कोणीही नसेल अशा प्रकारच्या मदतीसाठी नागरिक या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले आहे.

बिलाबाबत महापालिकेकडे करा तक्राररुग्णालयातून रुग्णाला डिस्चार्ज देताना बिलाबाबतच्या कोणत्याही तक्रारीचा अंतर्भाव या हेल्पलाईनमध्ये केलेला नाही. हॉस्पिटल बिलबाबत कोणतीही तक्रार असल्यास कोविड बिल लेखा परीक्षण समिती, पिंपरी -चिंचवड महापालिका यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महामारीच्या काळात नागरिकांची फसवणूक होत आहे. त्याबाबत कुठे तक्रार करावी, याबाबत नागरिकांना माहिती नसते. त्यासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. नागरिक त्यांच्या तक्रारी मांडू शकतात.- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

या क्रमांकावर साधता येईल संपर्क८०१०४३०००७८०१०८१०००७ ८०१०४६०००७८०१०८३०००७

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त