पिंपरी महापालिका प्रशासनाला मराठी भाषेचे वावडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 15:20 IST2019-09-07T15:17:47+5:302019-09-07T15:20:24+5:30
राज्य शासनाने ७ मे २०१८ रोजी राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कामकाज मराठीत करण्याचा अध्यादेश काढला..

पिंपरी महापालिका प्रशासनाला मराठी भाषेचे वावडे
प्रकाश गायकर-
पिंपरी : राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे संपूर्ण कामकाज हे मराठीत करण्याचा राज्यशासनाने अध्यादेश काढला. त्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. महापालिकेचे अनेक विभाग पत्रव्यवहार व कामकाज इंग्रजीमधूनच करत आहेत. त्यामुळे राज्यशासनाच्या या अध्यादेशालाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने कात्रजचा घाट दाखविल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य शा
संकेतस्थळावरही इंग्रजीतच माहिती
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरही बहुतांश माहिती इंग्रजीमधून आहे. त्याचप्रमाणे करारनामे, अधिसूचना ही इंग्रजी भाषेतच आहेत. त्यावरून महापालिका प्रशासनाची मराठी भाषेप्रती असलेली अनास्था स्पष्ट होते.
................
स्थापत्य विभागाकडून ठेकेदार कंपनीला देण्यात येणारे करारनामे मराठी भाषेत करण्यास सांगितले आहे. तसेच सर्वच विभागांना या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार स्थापत्य विभागाने कार्यवाही करण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे यापुढे या विभागांचे करारनामे मराठी भाषेत केले जातील. ह्णह्ण - संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त.
