शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हॉकर्स झोनला पिंपरी महापालिकेचा ठेंगा; सर्वेक्षण नावालाच, फेरीवाले प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 16:42 IST

शहरात आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय हे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले

पिंपरी : शहरातील फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन करण्यासाठी महापालिकेने प्रत्यक्ष जागेवर जात सर्वेक्षण केले. त्यामध्ये १८ हजार ६०३ फेरीवाल्यांची नोंद झाली. त्याला ९ महिने पूर्ण झाल्यानंतरही अद्याप विक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात आले नाही. तसेच, हॉकर्स झोनची ठिकाणे निश्चित करण्यात आली नाहीत. त्यामुळे सर्वेक्षणाचा निव्वळ देखावा करणाऱ्या प्रशासनाविरोधात फेरीवाले नाराजी व्यक्त करत आहेत.   शहरात आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय हे फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. महापालिकेने नेमलेल्या एजन्सीमार्फत १ नोव्हेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत सर्वेक्षण करण्यात आले. शासनाच्या अ‍ॅपवर विक्रेत्यांची बायोमेट्रिक पद्धतीने ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. प्रत्यक्ष जागेवर जाऊन हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये एकूण १८ हजार ६०३ विक्रेत्यांचे सर्वेक्षण झाले.  मात्र, क्षेत्रीय कार्यालयनिहाय हॉकर्स झोन तयार करण्यास क्षेत्रीय अधिकार्‍यांकडून कार्यवाही होत नसल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षण पूर्ण होऊन देखील विक्रेत्यांना अद्याप ओळखपत्र देण्यात आली नाहीत. त्यामुळे महापालिका करत असलेल्या कारवाईला त्यांना सामोरे जावे लागत आहे. कागदपत्रांची पूर्तता करूनही हॉकर्स झोन होत नसल्याने शहरातील गोर-गरीब फेरीवाले संकटात सापडले आहेत. 

तर ‘त्यांना’ यादीतून वगळणार

अद्याप कागदपत्रे जमा न केलेल्या फेरीवाल्यांकडून कागदपत्रे जमा करण्याची मुदत देण्याची सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी केली. त्यानुसार एक ते दोन आठवडे मुदत त्यांना देण्यात येणार आहेत. तसेच, प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या विक्रेत्यांची पडताळणी केली जाणार आहे. जे कागदपत्रे देणार नाहीत. तसेच, जागेवर व्यवसाय करीत नाहीत, त्यांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १५ दिवसांत पूर्ण करून यादी अंतिम केली जाणार आहे, असे भूमि आणि जिंदगी विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

''सर्वेक्षणानुसार फेरीवाल्यांची यादी अंतिम करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या १५ दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर हॉकर्स झोन व ओळखपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.  - मगेश कोळप, प्रशासन अधिकारी, भूमि आणि जिंदगी विभाग.''  

अशी झाली नोंद क्षेत्रीय कार्यालय - नोंद

अ - ४,४१९ब - १,९३९क - २,४४०ड - १,१२०ई - १,८३२फ - २,९४८ग - १,६६२

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तSocialसामाजिक