शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेला मिळकत करातून मिळाले २२८ कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 16:50 IST

सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षाकरिता ५८२ कोटी अंदाजपत्रक वसुली उद्दिष्ट दिले आहे.

ठळक मुद्देऑनलाईन सुविधेचा वापर करुन रुपये १२६ कोटी रकमेचा भरणा

पिंपरी : महापालिकेच्या वतीने जून अखेरीपर्यंत मिळकत कर भरणाऱ्यांसाठी करसवलत योजना जाहिर केली होती. त्यानुसारी आगाऊ कर भरण्यास नागरिकांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. जूनअखेर १ लाख ९७ हजार ७४२ मालमत्ताधारकांनी २२८.२३ कोटींचा भरणा केलेला आहे. त्यामध्ये १२६ कोटींचा ऑनलाईन भरणा झाला आहे.  सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षाकरिता ५८२ कोटी अंदाजपत्रक वसुली उद्दिष्ट दिले आहे. जूनअखेरपर्यंत २२८.२३ कोटी रुपये वसूली करण्यात आले आहे. मिळकत कराचा ऑनलाईन भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना सर्वसाधारण (चालू वर्षाचे मागणीतील सामान्य करात) करात दोन टक्के सवलत लागू राहील. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मिळकत कर सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी ३० जूनपूर्वी मिळकत कराची थकबाकीसह दोन्ही सहामाहीचे संपूर्ण बिलांची रक्कम भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना सामान्य करातील सवलत योजना लागू करण्यात आली होती. सोळा करसंकलन विभागीय कार्यालय, महापालिकेची आठ क्षेत्रिय कार्यालये संकेतस्थळावर ऑनलाईन पेमेंट गेट-वे द्वारे मिळकतकराचा भरणा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.सवलतीच्या कालावधीमध्ये १ लाख ८ हजार २२ मिळकतधारकांनी ऑनलाईन सुविधेचा वापर करुन रुपये १२६ कोटी रकमेचा मिळकत करापोटी भरणा केला आहे. ८ हजार ११६  महिलांनी ६.५९ कोटी, ५९० दिव्यांग मिळकत धारकांनी ४० लाख, २ हजार २६९ माजी सैनिकांनी १.७३ कोटी, १२ शौर्यपदक सैनिकांनी  ३० हजार रुपयांचा भरणा केला आहे. 

कर भरण्यासाठी आवाहन१ एप्रिल ते ३० जून अखेर एक लाख ९७ हजार ७४२ मिळकत धारकांनी एकूण २२८.२३ कोटी मिळकतकराचा भरणा केला आहे. गतवर्षी सन २०१८-२०१९ मध्ये १ लाख ७२ हजार ७२६ मिळकतधारकांनी १८.६८ कोटी रुपयाचा भरणा केला होता. मिळकतधारक आणि भोगवटादार यांनी ३० सप्टेंबर अखेर पहिल्या सहामाही अखेरची थकबाकीसह संपूर्ण रक्कम भरुन शास्ती,  व्याज रक्कमेची आकारणी टाळावी, असे आवाहन कर संकलन विभागाने केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTaxकरonlineऑनलाइन