पिंपरी- चिंचवडकरांनो, गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 10:05 PM2021-06-01T22:05:17+5:302021-06-01T22:05:32+5:30

दुरुस्तीच्या कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद;/शुक्रवारी विस्कळीत स्वरुपात पाणी येणार 

Pimpri-Chinchwad: Water supply to the city will be closed on Thursday | पिंपरी- चिंचवडकरांनो, गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

पिंपरी- चिंचवडकरांनो, गुरुवारी शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद

googlenewsNext

पिंपरी : रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी गुरुवारी पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केल्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे सायंकाळाचा पाणीपुरवठा होणार नाही. तर, शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी - चिंचवडकरांना पाणीपुरवठा केला जातो. रावेत येथील बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर २३ निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणे, सेक्टर क्रमांक २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे. शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी गुरुवारी  शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेमार्फत गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा केला जाईल. परंतु, त्यानंतर दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठ्याची सर्व यंत्रणा बंद ठेवल्यामुळे  शहरातील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Web Title: Pimpri-Chinchwad: Water supply to the city will be closed on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.