शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई; तब्बल २ कोटींचे एमडी जप्त

By प्रकाश गायकर | Updated: March 1, 2024 19:07 IST

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली असून आरोपीकडून दोन कोटी 2 लाखांचे ड्रग्स आणि एक मोबाईल जप्त केला आहे

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांनी पिंपळे निलख येथून एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल 2 कोटी 2 लाख रुपये किंमतीचे 2 किलो मेफेड्रोन ड्रग्स जप्त केले आहे. शुक्रवारी (दि. 1) पहाटे साडेचार वाजता रक्षक चौक, पिंपळे निलख  येथे ही कारवाई करण्यात आली. नमामी शंकर झा (वय 32, रा.  निगडी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली असून आरोपीकडून दोन कोटी 2 लाखांचे ड्रग्स आणि एक मोबाईल जप्त केला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पाटील हे पिंपळे निलख भागात गस्त घालत होते. दरम्यान रक्षक चौकाच्या पुढील बाजुस डी.पी. रोड पिंपळे निलख येथे पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हातामध्ये पांढऱ्या रंगाची पिशवी असलेला एक व्यक्ती त्यांना पाहून घाईघाईने निघून जाऊ लागला. त्यांना संशय आल्याने त्यांनी अतिरिक्त स्टाफ मागवून घेतला. त्यांच्या मदतीने त्या अनोळखी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या हातातील पिशवीबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने पिशवीमध्ये एम.डी. हा अंमली पदार्थ असल्याचे कबूल केले.  तपास पथकातील स्टाफ व दोन पंच बोलावुन त्याच्या ताब्यातील पिशवीची झडती घेण्यात आली. त्यामध्ये 2 कोटी 2 लाख रुपये किंमतीचा 2 किलो 38 ग्रॅम एम.डी. (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ तसेच 10 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले. याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असुन पुढील तपास चालू आहे. आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेDrugsअमली पदार्थPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMONEYपैसा