शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीला ‘अंकुश’ लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘कोम्बिंग ऑपरेशन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 17:31 IST

या कारवाईत ८१ आरोपी मिळून आले

पिंपरी : गुन्हेगारीला ‘अंकुश’ लावण्यासाठी पिंपरी-चिंचवडपोलिसांकडून गुरुवारी (दि. १९) कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. यात तीन आरोपी आरोपी शस्त्र बाळगताना मिळून आले. त्यांच्याकडून हत्यार जप्त केले. तसेच या कारवाईत ८१ आरोपी मिळून आले. 

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडून शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यात आला. यात प्रत्येक पोलीस ठाण्यातील सराईत गुन्हेगार, फरार आणि पाहिजे आरोपी यांची माहिती घेण्यात आली. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आयुक्त शिंदे यांनी दिल्या. त्यानुसार पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. गुन्हे शाखेचे युनिट एक ते पाच, खंडणी विरोधी पथक, दरोडा विरोधी पथक, शस्त्र विरोधी पथक यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पहाटे पाचपर्यंत हे कोम्बिंग ऑपरेशन केले. यात गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने तीन आरोपींना अटक केली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१चे कलम ३७(३) सह १३५ प्रमाणे दोन गुन्हे दाखल केले. तसेच एक लोखंडी कोयता, मोबाईल व गुन्ह्यत वापरलेली दुचाकी असा ५६ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. 

रेकाॅर्डवरील १३० आरोपी चेक केले. त्यातील ६० आरोपी मिळून आले. हिस्ट्रीशिटर ५२ आरोपी चेक केले. त्यातील १५ मिळून आले. गुंड, मवाली १८ चेक केले. त्यातील सहा मिळून आले. तसेच तडीपार आरोपी ९५, फरार आरोपी १२, पाहिजे आरोपी ८४, जबरी चोरी करणारे पाच आरोपी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान चेक केले. यात मिळून न आलेल्या गुन्हेगारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 

पोलीस ठाण्यांकडूनही कारवाईगुन्हे शाखेप्रमाणेच पोलीस ठाण्यांकडूनही कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. यात रात्री उशिरापर्यंत विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांवर, रात्री उशिरापर्यंत हाॅटेल सुरू ठेवल्याप्रकरणी १० जणांवर तसेच गोंधळ घालत असलेल्या १५ आणि इतर सहा जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमानुसार पाच जणांवर कारवाई केली. तसेच दोन जणांना अटक करण्यात आली आणि पाच जणांना ‘वाॅरंट’ बजावण्यात आले. तसेच भादंवि कलम ३७९ अन्वये एका आरोपीला अटक केली.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड