शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पिंपरी - चिंचवडला ‘नोटा’चाही मतदार; चारही मतदारसंघात दोन टक्क्यांपर्यंत नोटाला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 16:20 IST

चिंचवड मतदारसंघात नोटाला सर्वाधिक ५ हजार ८७४ मतदान झाले. तर मावळात सर्वात कमी १ हजार ४९० मतदारांनी नोटाला मत

ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : चारही विधानसभा मतदारसंघातील २०१९ विधानसभा निवडणुकीत १४ हजार २४६ मतदारांनी नोटाला मतदान केले. निवडणुकीतील उमेदवारांना मतदान न करता मतदारांनी नोटाला मतदान केले. चिंचवड मतदारसंघात नोटाला सर्वाधिक ५ हजार ८७४ मतदान झाले. तर मावळात सर्वात कमी १ हजार ४९० मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. चारही मतदारसंघात गेल्या चारही विधानसभा निवडणुकीत ०.५० ते दोन टक्केपर्यंत नोटाला मतदान झाले होते.

मतदानासाठी १९९० पासून ईव्हीएम मशीनचा वापर सुरू झाला. त्यापूर्वी बॅलेट पेपरवर मतदान होत असे. ईव्हीएमवर २०११ मध्ये नोटाचा वापर सुरू झाला. त्यापूर्वी नोटा अस्तित्वात नव्हता. उमेदवारांची नावे आणि त्यांच्या चिन्हानंतर सर्वात शेवटी यापैकी कुणीच नाही म्हणजे नोटा या पर्यायाचा वापर सुरू झाला. सरासरी दरवर्षी प्रत्येक मतदारसंघात ०.५० ते दोन टक्के पर्यंत नोटाला मतदान होते. लोकसभा निवडणुकीत तीन ते पाच टक्क्यांपर्यंत नोटाला मतदान झालेले आहे. ईव्हीएम मशीनवर दर्शविलेल्या २०११मध्ये उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर, वरीलपैकी कोणीही नाही म्हणजे नोटा हा पर्याय निवडणे मतदारांना शक्य झाले. संख्या ही अधिक असेल तर, ती निवडणूक रद्द होते. संबंधित मतदारसंघात फेरनिवडणूक घेतली जाते. आतापर्यंत असा प्रसंग उद्भवलेला नाही.

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघात एकूण ११ हजार ९१ मतदान नोटाला झाले होते. त्यामध्ये सर्वांत जास्त पिंपरी मतदारसंघात ४ हजार ४३२ मतदान नोटाला झाले होते. त्याखालोखाल चिंचवड मतदारसंघात ३ हजार २०३ मतदारांनी नोटाला मतदान केले होते. तर भोसरी मतदारसंघात १ हजार ४४७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. सगळ्यात कमी मावळ मतदारसंघात २ हजार मतदारांनी नोटाला पसंती दिली होती.

२०१९ ला १४ हजार मतदार

२०१९ ला विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघात एकूण १४ हजार २४६ मतदान नोटाला झाले होते. त्यामध्ये सर्वांत जास्त चिंचवड मतदारसंघात ५ हजार ८७४ मतदान नोटाला झाले होते. त्याखालोखाल पिंपरी मतदारसंघात ३ हजार २४६ मतदारांनी नोटाला मतदान केले होते. तर भोसरी मतदारसंघात ३ हजार ६३६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता. सगळ्यात कमी मावळ मतदारसंघात १ हजार ४९० मतदारांनी नोटाला पसंती दिली होती.

असे झाले नोटाला मतदान

मतदारसंघ                      २०१४                                                       २०१९                एकूण मतदान    नोटाला झालेले मतदान    एकूण मतदान    नोटाला झालेले मतदान (टक्केवारीमध्ये)

मावळ              ७१.११                  ०.९६                    ७१.२१                      ०.६०चिंचवड :         ५६.२७                  १.१८                    ५३.६६                      २.११

पिंपरी :            ४६.२२                 २.५१                    ५०.२१                        १.८३भोसरी :           ६०.८६                 ०.६५                    ५९.७१                       १.३८

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४VotingमतदानWomenमहिलाvidhan sabhaविधानसभा