पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्टी

By विश्वास मोरे | Updated: September 27, 2023 21:59 IST2023-09-27T21:57:30+5:302023-09-27T21:59:33+5:30

तसेच ईद-ए-मिलाद शुक्रवारी आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन दिवस सुट्ट्या जाहीर केले आहेत....

Pimpri-Chinchwad Municipal Corporation employees four consecutive days off | पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्टी

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना सलग चार दिवस सुट्टी

पिंपरी : अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद असे दोन दिवस सुट्टी आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवार अशा दोन दिवस सुट्टया आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना चार दिवस सुट्टी मिळणार आहे. गणेशोत्सवाची सांगता गुरुवारी होणार आहे. तसेच ईद-ए-मिलाद शुक्रवारी आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दोन दिवस सुट्ट्या जाहीर केले आहेत.

तसेच पाच दिवसांचा आठवडा असल्याने शनिवार आणि रविवार शासकीय कार्यालयांना सुट्टी असते. उद्यापासून सलग चार दिवस शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी असणार आहे. गुरुवार आणि शुक्रवार अशा दोन सुट्टीबाबतचे आदेश महापालिकेचे प्रशासन विभागाचे आयुक्त सहाय्यक आयुक्त विठ्ठल जोशी यांनी काढले आहेत.

Web Title: Pimpri-Chinchwad Municipal Corporation employees four consecutive days off