शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर अजित पवारांची माफी मागा; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला
2
'ठाकरे ब्रँड'चा फायदा उद्धव-राजना होणार? मराठी मतं 'गेम' फिरवणार? सर्व्हेची टक्केवारी समोर
3
WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ
4
"उत्तर भारतीयांकडे वाकड्या नजरेने कुणी पाहिले तर..."; भाजपा मंत्री नितेश राणे काय बोलून गेले?
5
शिंदेसेनेला मतदान करा, जैन व्यापाऱ्याच्या मुलाची पोस्ट; भाजपा उमेदवाराच्या पत्नीने दिली धमकी
6
'गणेश नाईक यांची मनस्थिती बिघडली, त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जा', शिंदेसेनेची बोचरी टीका
7
बांगलादेशला लागणार जॅकपॉट! ५०० टक्के टॅरिफच्या टांगत्या तलवारीनं का वाढली भारताची डोकेदुखी?
8
राम मंदिराजवळ नमाज पढणारा अब्दुल अहद शेख कोण? बॅगेत सापडलं असं काही, कुटुंबीय म्हणाले...  
9
PCMC Election 2026: निवडणुका जवळ आल्या की, अनेकांचा कंठ फुटून काहीही बोलतात, दादा आपण रागवायचं नाही - देवेंद्र फडणवीस
10
सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मुंबईहून पालघरला आले, पोहायला पाण्यात उतरले आणि एकावर मृत्युने घातली झडप
11
ठाकरे बंधूंच्या 'शिवगर्जनेची' तारीख ठरली! शिवाजी पार्कवर राज ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार?
12
शरद पवार अन् अजित पवार एकत्र येणार नाहीत?; प्रफुल पटेल यांच्या विधानानं नव्या चर्चांना उधाण
13
WPL 2026 : अनुष्का शर्माचा ‘पायगुण’! GG ची ‘साडेसाती’ संपली; UP वॉरियर्सकडून ‘ती’ एकटीच लढली
14
मोदी सरकारविरोधात लिखाण करणाऱ्या डॉ. संग्राम पाटील यांना मुंबईत येताच पोलिसांनी घेतलं ताब्यात
15
Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?
16
"आमचा जीव घेतला तरीही..."; सुप्रिया सुळे कडाडल्या; भाजपाला इशारा, मुंबईबाबत काय म्हणाल्या?
17
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
18
Video - ओडिशामध्ये ९ सीटर चार्टर्ड प्लेन क्रॅश; पायलटसह ६ जण गंभीर जखमी
19
ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं
20
Washim: ४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं; आरोपीला पकडलं आणि घटना ऐकून पोलीस हादरले
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Elections 2026:टीकाकारांची पात्रता पाहूनच प्रतिक्रिया; सुपारीबाजांकडे दुर्लक्ष; अजित पवारांचा पुन्हा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:45 IST

टीका एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला.

पिंपरी : टीका करणारा किती पात्रतेचा आहे, हे पाहूनच ती मनावर किती घ्यायची, हे ठरवले पाहिजे. काही जण सुपारीबाज आहेत, त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही. पूर्वीचा माझा स्वभाव आणि आजचा स्वभाव वेगळा आहे. सगळ्यांना सोबत घेऊन काम करावे लागते, हे आता कळले आहे. टीका एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिला.

उपमुख्यमंत्री पवार गुरुवारी (दि.८) पिंपरी-चिंचवड येथे महापालिका निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पवार म्हणाले की, देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहून मतदान केले.  पिंपरी-चिंचवडमध्ये माझ्याकडे पाहून आमच्या पक्षाला मतदान करा. येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. सुरुवातीला येथे बाहेरचा-गाववाला असा संघर्ष होता, मात्र नंतर ते चित्र बदलले. आम्ही परिस्थिती बदलण्याचे प्रयत्न सातत्याने करत आहोत. जॅकवेल, केबल टेंडरमधील रिंग मोडून काढली. पूर्वी इथे ‘तूही खा, मीही खातो’ अशी अवस्था होती. ती मी बंद केली. मी पद दिल्यानंतर काही जणांना ताकद मिळाली, मात्र त्यांना जबाबदारी पेलली नाही, त्यामुळेच आज घडी विस्कटली आहे. पाणी, कचरा, टँकर माफिया, बकालपणा हे गंभीर प्रश्न आहेत. 

स्थानिक कार्यकर्त्यांना जागे करायला आलो!

अजित पवार म्हणाले की, आमचे स्थानिक कार्यकर्ते काही ठिकाणी कमी पडले. त्यांना जागे करायला मी आलो आहे. निष्ठावंत भाजप कार्यकर्ते नाराज असल्यामुळे अनेक जण आमच्याकडे येत आहेत. शिंदेसेनेसोबत युतीची चर्चा सुरुवातीपासून झाली असती तर एकत्र आलो असतो. पण येथे आम्हाला निर्विवाद बहुमत मिळेल. राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवलेली नसून ते प्रचारासाठी वेळ देणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar: Ignore biased critics, focus on Pimpri-Chinchwad's development.

Web Summary : Ajit Pawar urges ignoring unqualified critics, focusing on Pimpri-Chinchwad's development. He highlights past corruption cleanup and seeks votes based on development work. Pawar aims to galvanize local workers and expects a clear majority.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस