शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:40 IST

मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाटे यांचा प्रवेश झाला आहे.

पिंपरी :चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्षाचे) नेते माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी मंगळवारी भाजपत प्रवेश केला आहे. मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाटे यांचा प्रवेश झाला आहे. यावेळी आमदार शंकर जगताप, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते.

महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून राहुल कलाटे भाजपत प्रवेश करणार की राष्ट्रवादीत? या बाबतच्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांना बोलावले होते. तर मागील आठवड्यात कलाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

त्यानंतर शनिवारी शहरातील २२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला होता. दरम्यान, कलाटे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर कलाटे यांच्या प्रवेशाचे काय होणार? अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजताच कलाटे यांच्या समर्थकांनी चलो मुंबई असे स्टेटस ठेवले. त्यानंतर मुंबईत मंगळवारी (दि. २३) दुपारी प्रवेश झाला.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करूया.  आमदार शंकर जगताप म्हणाले, महापालिका निवडणुकीत भाजप अबकी बार सव्वाशे पार होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : NCP's Rahul Kalate Joins BJP, Ignoring Local Party Opposition

Web Summary : NCP's Rahul Kalate joined BJP in Mumbai amidst opposition from local leaders. The move, speculated for weeks, occurred before municipal elections. BJP leaders welcomed Kalate, aiming for a strong performance in the upcoming polls, targeting over 125 seats.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारchinchwad-acचिंचवडpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस