पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भोसरी परिसरात रॅली झाली. या रॅली दरम्यान भोसरीत एका इमारतीला आग लागली. ही घटना रविवारी (दि. ११ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी रॅली झाली. ही रॅली सुरु असताना मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात येत होती. ठिकठिकाणी फटाके वाजवून रॅलीचे स्वागत करण्यात येत होते. दरम्यान, भोसरी येथील दिघी रस्त्यावरील एका इमारतीवर अचानक आग लागली. काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. इमारतीवर मोबाइल टॉवर असल्याने मोठी हानी होण्याचा धोका निर्माण झाला होता.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवली. वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले.
Web Summary : A fire erupted at a Bhosari building during Chief Minister Fadnavis' rally due to suspected fireworks. Firefighters quickly controlled the blaze, preventing major damage. No casualties reported.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस की रैली के दौरान भोसरी की एक इमारत में आतिशबाजी के कारण आग लग गई। दमकल कर्मियों ने तुरंत आग पर काबू पाया, जिससे बड़ा नुकसान टल गया। कोई हताहत नहीं।