शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
4
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
5
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
6
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
7
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
8
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
9
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
10
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
11
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
12
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
13
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
14
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
15
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
16
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
17
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
20
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election : पिंपरीत भाजपची पहिली यादी उद्या, राष्ट्रवादीचाही मास्टरस्ट्रोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 11:00 IST

- अंतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचा आटापिटा; आझम पानसरेंच्या घरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक, निर्णय गुलदस्त्यात, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय राजकीय परिस्थिती, स्थानिक समीकरणे, इच्छुक उमेदवारांची ताकद, संघटनात्मक कामगिरी यांचा आढावा

पिंपरी :  महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पहिली उमेदवार यादी रविवारी (दि. २८) जाहीर होणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी शुक्रवारी दिली. तर राष्ट्रवादीची तयारी जोरात सुरू असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी महापौर आझम पानसरे यांच्या घरी शुक्रवारी भेट दिली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरू आहेत. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवार निवड हे मोठे आव्हान ठरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात बैठक घेतली. यावेळी कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय राजकीय परिस्थिती, स्थानिक समीकरणे, इच्छुक उमेदवारांची ताकद, संघटनात्मक कामगिरी आणि जिंकण्याची क्षमता यांचा सखोल आढावा घेतला. ज्या प्रभागांमध्ये उमेदवारीबाबत एकमत झाले आहे, त्या नावांना प्राथमिक मान्यता दिली. अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. त्यामुळे रविवारी भाजपची पहिली यादी जाहीर होईल, अशी आमदार जगताप यांनी माहिती दिली.

राष्ट्रवादीतही घडामोडींना वेग

या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही तयारीला वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांकडून प्रभागनिहाय ताकद मोजणे, उमेदवारीवर चर्चा, प्रचार आराखडा आणि संभाव्य आघाड्यांबाबत बैठका सुरू आहेत. भाजपची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडून रणनीती आखण्यावर भर दिला जात आहे.

ठरले की सांगतो : अजित पवार

राष्ट्रवादीचे (अजित पवार) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांची त्यांच्या निगडी येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार यांच्यासमवेत पानसरे, निहाल पानसरे, नाना काटे, प्रमोद कुटे, जिशान सय्यद, योगेश बाबर, प्रशांत कापसे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांनी ठरले की सांगतो, एवढीच प्रतिक्रिया देत माध्यमांशी बोलणे टाळले.

दोन दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील : पानसरे

उपमुख्यमंत्री पवार माझ्या निवासस्थानी भेटीसाठी आले होते. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पुढील दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पिंपरी-चिंचवडमध्ये शंभर टक्के सत्ता मिळेल, असा दावा माजी महापौर आझम पानसरे यांनी केला. दरम्यान, आपण स्वतः आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, या प्रश्नावर पानसरे यांनी नकार दिला असून, निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. ---

बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून काळजी

उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराजी आणि अंतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून विशेष काळजी घेतली जात आहे. काही प्रभागांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने नाराजांची समजूत घालणे, पर्यायी जबाबदाऱ्या देणे आणि संघटनात्मक पातळीवर त्यांना सक्रिय ठेवण्याची रणनीती आखली आहे. भाजपमध्ये अनेक प्रभागांत इच्छुकांची संख्या अधिक असल्याने अंतर्गत बंडखोरीचा धोका वाढला आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते आणि स्थानिक नेतृत्वाकडून नाराजांना समजूत घालण्याचे प्रयत्न, सर्वेक्षणांच्या आधारे अंतिम नावे ठरवण्याची प्रक्रिया, तसेच पर्यायी जबाबदाऱ्यांचे आश्वासन देण्याची रणनीती आखली जात आहे. पहिल्या यादीत ‘विजयी चेहरा’ आणि ‘संघटनात्मक समतोल’ या निकषांना प्राधान्य दिले जाण्याची चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Municipal Election: BJP's First List Tomorrow, NCP's Masterstroke

Web Summary : BJP's first candidate list for Pimpri-Chinchwad municipal elections releases Sunday. NCP strategizing; Ajit Pawar met Azam Pansare, hinting at potential alliance before BJP announces list. Upset party members will be placated.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपा