शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Election Results 2026 : स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी भाजप-राष्ट्रवादीत ‘लॉबिंग’

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 21, 2026 15:47 IST

- भाजपकडून सात, तर राष्ट्रवादीकडून तिघांना संधी मिळणार : बारा नगरसेवकांच्या मागे एक स्वीकृत याप्रमाणे होणार विभागणी; पक्षासाठी आर्थिक, संघटनात्मक आणि प्रचारात योगदान दिलेल्यांना प्राधान्य

पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहा करण्याचा निर्णय राज्य शासनाने मार्च २०२३ मध्ये घेतला आहे. निवडून आलेल्या महापालिकेतील संख्याबळानुसार भाजपकडून सात, तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून तिघांना स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी अनेकजण इच्छुक असून, दोन्ही पक्षांत शहरात जोरदार ‘लॉबिंग’ सुरू आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ८४ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला ३७ जागा मिळाल्या आहेत. शिंदेसेनेस केवळ सहा जागा मिळाल्यामुळे प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादीला स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे. राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार १२ नगरसेवकांच्या मागे एक स्वीकृत याप्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार ८४ संख्याबळ असलेल्या भाजपला सात स्वीकृत नगरसेवक करता येतील, तर ३७ इतके संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादीला तिघांना स्वीकृतपदी संधी देता येईल.

भाजपकडून या सात स्वीकृत जागांवर पक्षसंघटनेत दीर्घकाळ काम केलेले पदाधिकारी, निवडणुकीत पराभूत झालेल्यांची नावे चर्चेत आहेत. पक्षातील प्रभावी नेते व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही नावांची चर्चा सुरू आहे. विशेषत: पक्षासाठी आर्थिक, संघटनात्मक आणि प्रचारात योगदान दिलेल्यांना प्राधान्य देण्याचा विचार असल्याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हटले आहे. यामुळे भाजपमधील इच्छुकांची संख्या मोठी असून, अंतिम यादी ठरवताना पक्षनेतृत्वासमोर मोठे आव्हान असणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडे तीन स्वीकृत नगरसेवकांची संधी असून, त्यासाठीही पक्षांतर्गत चढाओढ सुरू आहे. निवडणुकीत कमी मतांनी पराभूत झालेले उमेदवार, तसेच शहर पातळीवरील अनुभवी नेते यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.पक्षातील निष्ठावंत की समर्थकांना संधी?

महापालिकेतील प्रभाव टिकवून ठेवण्यासाठी स्वीकृत नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याने भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून ही निवड करण्यासाठी रणनीती वापरली जाणार आहे. स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढल्याने महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे संख्याबळ आणखी मजबूत होणार आहे. याचा परिणाम विविध महत्त्वाच्या निर्णयांवर दिसून येणार आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांना संधी मिळणार की स्थानिक व राज्यातील नेत्यांच्या समर्थकांची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पराभूतांना परत संधी नको..!

महापालिका निवडणुकीनंतर सत्ताधारी व विरोधकांच्या गोटात स्वीकृत सदस्य नेमण्याच्या हालचालींना वेग आला असताना, निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना स्वीकृत सदस्यपद देऊ नये, असा सूर पक्षांतर्गत चर्चेतून पुढे येत आहे. जनतेने स्पष्ट कौल दिल्यानंतर अपयशी ठरलेल्यांना पदे दिल्यास चुकीचा संदेश जाईल, अशी भूमिका काही नव्या नगरसेवकांकडून मांडली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : PCMC 2026: BJP and NCP Lobbying for Co-opted Corporator Seats

Web Summary : BJP and NCP are vying for co-opted corporator positions in PCMC after state decision increased seats. BJP, with its majority, gets seven seats, while NCP gets three, sparking intense lobbying within both parties. Loyalty vs. support is the key question.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड