पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीअखेर एकूण ४४३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, निवडणुकीच्या रिंगणात ६९२ उमेदवार राहिले आहेत. तब्बल १,१३५ उमेदवारांनी १९९३ अर्ज भरले होते. त्यातील ९९ अर्ज अवैध ठरले होते. त्यामुळे १८९४ अर्ज राहिले होते. जवळपास ४० टक्के उमेदवारांनी माघार घेतल्याने प्रभागांतील लढती स्पष्ट झाल्या आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (दि. २) दुपारी दोनपर्यंत होती. उमेदवारी माघारीनंतर अनेक ठिकाणी थेट दुहेरी लढत होण्याचे स्पष्ट झाले असून, काही प्रभागांत तिरंगी व चौरंगी लढती कायम आहेत. पक्षीय समन्वय, युती-आघाडीचे गणित साधत बंडखोरी रोखण्यासाठी, अर्ज माघारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न झाले. शनिवारपासून (दि. ३) प्रचाराला वेग येणार असून, जोरदार रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात एकूण १५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५७ जणांनी माघार घेतल्याने येथे आता १०० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात १७६ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी ७० जणांनी माघार घेतली असून, १०६ उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
‘क’ क्षेत्रीय कार्यालयात १४५ पैकी ५४ उमेदवारांनी माघार घेतली असून, ९१ जण रिंगणात आहेत. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयात १२४ पैकी ६३ उमेदवारांनी माघार घेतल्याने येथे ६१ उमेदवार उरले आहेत. ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात ८६ उमेदवारांपैकी ३३ जणांनी माघार घेतली असून, ५३ उमेदवार प्रत्यक्ष लढतीत आहेत.
‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात १४७ पैकी ४३ उमेदवारांनी माघार घेतली असून, १०४ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत १०० पैकी ४० उमेदवारांनी माघार घेतल्याने ६० उमेदवार उरले आहेत, तर ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक उमेदवार होते. येथे २०० उमेदवारांपैकी ८३ जणांनी माघार घेतली असून, ११७ उमेदवार अंतिम यादीत आहेत.
एकाच प्रभागात शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार)ची युती
प्रभाग २४ मध्ये शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती झाली आहे. या ठिकाणी दोन उमेदवार शिंदेसेनेचे असतील, तर दोन उमेदवार राष्ट्रवादी (अजित पवार)चे राहणार आहेत. याच प्रभागातील भाजपच्या तीन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्याने एकाच जागेवर ‘कमळ’ चिन्ह असणार आहे.
Web Summary : After 443 withdrawals, 692 candidates remain for PCMC Election 2026. Intense contests are expected. All parties are trying to prevent rebellion. Campaigning starts Saturday.
Web Summary : 443 नाम वापस होने के बाद, PCMC चुनाव 2026 में 692 उम्मीदवार मैदान में हैं। तीव्र प्रतिस्पर्धा की उम्मीद है। सभी पार्टियां विद्रोह को रोकने की कोशिश कर रही हैं। शनिवार से प्रचार शुरू।