शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
2
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
3
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
4
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
5
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
6
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
7
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
8
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
9
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
10
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
11
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
12
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
13
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
14
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
15
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
16
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
17
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
18
पनवेलमध्ये 'मविआ'ला उमेदवारांनीच दिला झटका! ७ जणांची माघार, भाजपाचे किती उमेदवार बिनविरोध विजयी?
19
राष्ट्रवादीचा 'मास्टरस्ट्रोक'! डॉक्टर, इंजिनिअर्ससह उत्तर भारतीयांना संधी, मलिक म्हणाले...
20
महापौरांसह सर्व समित्यांचे अध्यक्ष मराठीच हवेत! 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' कुणी केला जारी?
Daily Top 2Weekly Top 5

PCMC Municipal Election 2026: पिंपरीत राष्ट्रवादीला (अजित पवार) धक्का; भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध;भाजपच्या सुप्रिया चांदगुडे बिनविरोध

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 2, 2026 17:08 IST

Pimpri Chinchwad Municipal Election Results 2026: भाजपचे रवी लांडगे ही बिनविरोध झालेत. भाजपने सलग दुसरी जागा बिनविरोध करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला मोठा धक्का बसला. प्रभाग सहामधील उमेदवाराने अर्ज न भरल्याने भाजपचे रवी लांडगे बिनविरोध निवडून आल्यानंतर आता प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर, संभाजीनगर मधील पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपच्या सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. निवडणुकीपूर्वीच भाजपचे दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी, इंदिरानगर, दत्तनगर, विद्यानगर, लालटोपीनगर, अमृतेश्वर कॉलनी, म्हाडा कॉलनी, मोरवाडीमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या 'ब' जागेसाठी भाजपकडून सुप्रिया चांदगुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने वर्षा भालेराव यांना उमेदवारी दिली. त्यांनी अर्जही दाखल केला होता. परंतु, शुक्रवारी माघारीच्या मुदतीत भालेराव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.  मागच्या निवडणुकीत पराभव...सुप्रिया चांदगुडे यांच्या विरोधात अजित पवार राष्ट्रवादीच्या (अजित पवार) वर्षा भालेराव, मनसेच्या गीता चव्हाण, अपक्ष रेणुका भोजने आणि रोहिणी रासकर उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे प्रभाग १० ब मधून सुप्रिया चांदगुडे बिनविरोध निवडून आल्या आहेत. सुप्रिया चांदगुडे या उद्योजक उमेश चांदगुडे यांच्या भावजय आहेत. सुप्रिया चांदगुडे २०१७ च्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. त्यांना ९ हजार ९३३ मते पडली होती. या निवडणुकीत मात्र त्यांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्या याआधी भाजपचे रवी लांडगे ही बिनविरोध झालेत. भाजपने सलग दुसरी जागा बिनविरोध करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उमेदवारांना माघार घ्यायला लावली आहे. प्रभाग दहामध्ये आता भाजपचे तीन उमेदवारप्रभाग क्रमांक दहा मधील सुप्रिया चांदगुडे यांची बिनविरोध निवड झाल्याने आता भाजपचे तीन उमेदवार रिंगणात असणार आहेत. विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्या आई अनुराधा गोरखे, माजी महापौर मंगला कदम यांचे चिंरजीव कुशाग्र कदम आणि माजी उपमहापौर तुषार हिंगे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या निलीमा पवार, संदीप चव्हाण, सतिश क्षीरसागर हे उमेदवार असणार आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Setback for NCP (Ajit Pawar) in Pimpri; Two BJP Councilors Unopposed

Web Summary : Ahead of Pimpri-Chinchwad elections, NCP faced a setback as two BJP candidates, Ravi Landge and Supriya Chandgude, were elected unopposed after rivals withdrew. Chandgude's victory fulfills her councilor dream after a previous defeat. This strengthens BJP's position in Ward 10.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2026Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६