पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून शहरातील हवा प्रदूषणाने सातत्याने धोकादायक पातळी ओलांडली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सलग अनेक दिवस ‘खराब’ श्रेणीत राहिल्यामुळे शहराची गणना महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत झाली आहे. पिंपरी-चिंचवडकरांसाठी चिंताजनक बाब असून, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी यांच्याद्वारे चालवल्या जाणाऱ्या केंद्रांमार्फत २८ ठिकाणी हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवले जाते. अलीकडील नोंदीनुसार महापालिका क्षेत्राने सर्वाधिक प्रदूषणाची पातळी नोंदवली आहे. डिसेंबरच्या पहिल्याच पंधरवड्यात शहराच्या एक्यूआयने १४ दिवसांपैकी सात दिवस २०० अंकांची मर्यादा ओलांडली होती. हवेच्या गुणवत्तेत झालेल्या घसरणीसाठी पीएम २.५ आणि पीएम १० हे सूक्ष्म कण प्रमुख घटक आहेत. ही हवा ‘अतिशय खराब’ श्रेणीत मोडते. अशा हवेमुळे श्वासोच्छ्वास आणि हृदयविकाराच्या व्यक्तींना धोका निर्माण होतो.
बांधकाम आणि उद्योगांचे प्रदूषण
शहरातील बांधकाम प्रकल्प हवेत धुळीचे कण मिसळण्यास कारणीभूत ठरत आहेत. रेडी-मिक्स काँक्रिट प्लांट्समधून होणारे उत्सर्जन वातावरणाला विषारी बनवत आहे. वाहनांच्या धुरातून पीएम २.५ तर बांधकाम प्रकल्प, आरएमसी प्लांट्स, कचरा जाळणे यातून पीएम १० हे सूक्ष्म कण वातावरणात मिसळतात. औद्योगिक कामकाज आणि उत्सर्जनामुळे एकूण प्रदूषणभार वाढतो.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि श्वसनाचे आजार असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर जाणे टाळावे. अत्यावश्यक असल्यास एन ९५ मास्कचा वापर करणे आणि शारीरिक श्रमाची कामे घराबाहेर करणे टाळावे.
शहरातील हवा प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून, मिस्ट फाउंटन्स एअर बिन्स आणि यांत्रिक रस्ता-स्वच्छता यंत्रणा अशा उपाययोजना सुरू आहेत. प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्लांट्स आणि बांधकामस्थळांवर कारवाई केली जात आहे. - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता
Web Summary : Pimpri-Chinchwad's air quality hits dangerous levels, becoming Maharashtra's most polluted city. Construction, industries, and vehicle emissions contribute to hazardous PM2.5 and PM10 particles. Residents, especially vulnerable groups, are advised to take precautions. Authorities implement measures like mist fountains and stricter pollution control.
Web Summary : पिंपरी-चिंचवड की वायु गुणवत्ता खतरनाक स्तर पर, महाराष्ट्र का सबसे प्रदूषित शहर बना। निर्माण, उद्योग और वाहन उत्सर्जन खतरनाक पीएम2.5 और पीएम10 कणों का योगदान करते हैं। निवासियों, विशेषकर कमजोर समूहों को सावधानी बरतने की सलाह दी जाती है। अधिकारी प्रदूषण नियंत्रण के लिए उपाय लागू करते हैं।