शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी - चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे ‘भिक मांगो’ आंदोलन; शहरातील पे अँड पार्क पाॅलिसीचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 19:02 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध आंदोलन करून पे अँड पार्क या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या

ठळक मुद्देमिळकत करामध्ये देखील रस्ता सेवा कर घेतला जात असताना पे अँड पार्क धोरणाचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल

पिंपरी: महापालिकेकडून शहरात अँड पार्क पाॅलिसी लागू करण्यात आली आहे. त्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे पिंपरीत भिक मांगो आंदोलन करण्यात आले. महापालिका भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुरुवारी आंदोलकांनी धडक देत निदर्शने केली.  

पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निषेध आंदोलन करून पे अँड पार्क या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सिग्नलवर भिक मांगो आंदोलन केले. त्यानंतर आंदोलकांनी थेट महापालिका प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देत निदर्शने केली. 

वंचित बहुजन आघाडीचे  शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. पक्षाचे शहर कार्याध्यक्ष अंकुश कानडी, संजीवन कांबळे, महासचिव राजन नायर, राहुल सोनवणे, प्रवक्ता के. डी. वाघमारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

देवेंद्र तायडे म्हणाले, पे अँड पार्क पाॅलिसी रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली. त्याबाबत आठवडा भरापूर्वी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. वाहन खरेदी करताना आरटीओच्या माध्यमातून रोड टॅक्स घेतला जातो. मिळकत करामध्ये देखील रस्ता सेवा कर घेतला जात असताना पे अँड पार्क धोरणाचा अट्टाहास कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSocialसामाजिकVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी