शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

पिंपरी-चिंचवड न्यायालयीन कामकाज नेहरुनगर येथे स्थलांतरीत होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 3:47 PM

८ लाख ७७ हजार रुपये प्रति महिना या दराने पाच वर्षांसाठी ही इमारत न्यायालयासाठी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदरमहा ८ लाख ७७ हजार रुपये भाडे आकारण्यात येणार नवीन ठिकाणी २० प्रकारची वेगवेळी न्यायालये सुरू होणार पिंपरीत ८ मार्च १९८९ मध्ये मोरवाडीतील महापालिकेच्या शालेय इमारतीमध्ये न्यायालय सुरू

पिंपरी: मोरवाडी न्यायालयाची जागा अपुरी पडत असल्याने न्यायालयीन कामकाज तात्पुरत्या स्वरूपात नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील वाचनालय आणि दवाखान्यासाठी बांधलेल्या इमारतीतून चालणार आहे. पाच वर्षांसाठी ही इमारत न्यायालयासाठी देण्यात येणार आहे. त्यासाठी दरमहा ८ लाख ७७ हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरी असून, त्यात महापालिका, आरटीओ आणि आता पोलीस आयुक्तालयही मिळाले आहे. म्हणूनच स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरास स्वतंत्र न्यायालयीन इमारतीची आवश्यकता आहे. पिंपरीत ८ मार्च १९८९ मध्ये मोरवाडीतील महापालिकेच्या शालेय इमारतीमध्ये न्यायालय सुरू झाले. ही इमारत मोडकळीस आली आहे. राज्य शासनातर्फे पिंपरी न्यायालयासाठी प्राधिकरणाची मोशी येथील पेठ क्रमांक १४ मधील ६.५७ हेक्टर अर्थात सुमारे १६ एकर क्षेत्राची जागा ही न्यायसंकुलासाठी मंजुर केली आहे. मात्र, बांधकाम निधी मंजुर होऊ न शकल्याने आजपर्यंत न्याय संकुलाचे बांधकाम सुरू झाले नाही.  दरम्यान नेहरूनगरातील अण्णासाहेब मगर क्रीडासंकुलासमोरील इमारतीचा प्रस्ताव पुढे आला. या इमारतीची पाहणी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फेत केली. त्यानुसार, महापालिका नगररचना व विकास विभागामार्फेत न्यायालयासाठी पिंपरी - नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील जागा निश्चित केली आहे. या जागेवर वाहनतळ, टपाल कार्यालय, वाचनालय, दवाखाना असे सर्वसमावेशक आरक्षण आहे. त्यापैकी दवाखाना आणि वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम झाले आहे. या आरक्षणाअंतर्गत विकसित केलेल्या जमिनीच्या मुल्यांकनानुसार सन २०१७-१८ च्या रेडीरेकनर दराने जागेसाठीच्या रकमेवर आठ टक्के आणि बांधकाम क्षेत्रासाठीच्या रकमेवर दहा टक्के उत्पन्न विचारात घेतले आहे. या सर्वसमावेशक आरक्षणाअंतर्गत विकसित केलेल्या वाचनालय आणि दवाखाना बांधकामाच्या चटई क्षेत्रानुसार मासिक भाडे ४१.५० रुपये प्रतिचौरस फूट आणि वाहनतळासाठी मासिक भाडे १३.५० रुपये प्रतिचौरस फुटाप्रमाणे नगररचना व विकास विभागाने कळविले आहे. महापालिकेचे हित विचारात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने कळविलेली ८ लाख ७७ हजार रुपये प्रति महिना पाच वर्षांसाठी आकारण्यात येणार आहे. या विषयास स्थायी समिती सभेत आयत्यावेळी मंजुरी दिली. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले,न्यायालयासाठी नेहरूनगरात जागा उपलब्ध करून दिली आहे. नवीन ठिकाणी २० प्रकारची वेगवेळी न्यायालये सुरू होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पुण्यात जावे लागणार नाही. तसेच न्यायालयाच्या जागेसाठी राज्य शासनाकडे प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिस