शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

पिंपरी चिंचवड शहराचा पुणे जिल्ह्यात तिसरा क्रमांक; बारावीचा निकाल ९६.६४ टक्के

By प्रकाश गायकर | Updated: May 21, 2024 19:15 IST

पिंपरी चिंचवडमध्ये बारावीच्या परीक्षेत ९ हजार १२२ मुले तर ८ हजार ३७७ मुली असे एकूण १७ हजार ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत

पिंपरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी (दि. २१) बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचा निकाल ९६.६४ टक्के लागला असून पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पुणे विभागात पुणे, अहमदनगर आणि सोलापूर हे तीन जिल्हे येतात. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा निकाल सर्वात अधिक ९५.१९ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ सोलापूर जिल्हा ९४.४४ टक्के आणि तिसऱ्या क्रमांकावर अहमदनगर जिल्हा (९३.४० टक्के) आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक निकाल वेल्हा तालुक्याचा (९९.२७ टक्के) लागला. त्यानंतर मुळशी तालुका (९७.१४ टक्के) असून तिसऱ्या क्रमांकावर पिंपरी-चिंचवड शहर (९६.६४ टक्के) आहे.  पिंपरी-चिंचवड शहरातून ९ हजार ५७६ मुले आणि ८ हजार ६०७ मुली असे एकूण १८ हजार १८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ९ हजार ५३७ मुलांनी तर ८ हजार ५७० मुली अशा १८ हजार १०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बारावीच्या परीक्षेत ९ हजार १२२ मुले तर ८ हजार ३७७ मुली असे एकूण १७ हजार ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मुलांचा निकाल ९५.६४ टक्के तर मुलींचा निकाल ९७.७४ टक्के लागला आहे. शहरात ४१५ मुले आणि १९३ मुली असे एकूण ६०८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. --

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHSC Exam Resultबारावी निकालEducationशिक्षणStudentविद्यार्थीexamपरीक्षा