शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरपातळीवर बदल; कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:09 IST

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बदल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांची नियुक्ती केली आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशांत शितोळे तीनवेळा नगरसेवक म्हणून आले निवडूनशहर जिल्हा कार्याध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांची नियुक्ती

पिंपरी : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बदल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांची नियुक्ती केली आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शितोळे यांची नियुक्ती केली असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसमधून भाजपावासी झालेल्यांमुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आली. गेल्या वर्षभरात भाजपाची अनेक गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस आली. मात्र, त्यांना फारसा प्रखर विरोध झाला नाही. महापालिका निवडणुकीत माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे यांना उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून निवडणूक लढविली. त्यात पराभूत झाले होते. पराभूत होऊनही गेल्या वर्षभरात त्यांनी महापालिकेतील भाजपाच्या गैरकारभाराविषयी आवाज उठविला होता. भाजपातील रिंग, जुन्या बिलांतील तीन टक्केवारीच्या प्रकरणात आवाज उठविला होता. त्यांची दूर करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, डॉ. शैलेश मोहिते-पाटील आदी उपस्थित होते. 

चिंचवड विधानसभेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशांत शितोळे तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपद देखील भूषविले आहे. अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. फेब्रुवारी २०१७च्या महापालिका निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतर ते काही काळ राष्ट्रवादीपासून लांब राहिले. त्यानंतर शितोळे यांनी आता राष्ट्रवादीत सक्रीय होण्यास सुरुवात केली आहे. शितोळे हे एकेकाळी आमदार लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय होते. जगताप भाजपात गेल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाला शह देण्यासाठी ही खेळी असल्याचे मानले जात आहे.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड