शेताच्या बांधावर जाऊन अजित पवारांनी साधला शेतक-यांशी संवाद, हुरडा खाऊ घालून शेतकऱ्यांनी केले स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 08:40 PM2018-01-23T20:40:41+5:302018-01-23T20:44:05+5:30

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत केवळ सभांच्या माध्यमातून नव्हे तर विविध माध्यमातून नेते शेतक-यांशी संवाद साधत असून आज तर शेतक-यांच्या बांधावर जाऊन हुरडा खात संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून जात आहे.

Ajit Pawar visits farmers 'farm, welcomes farmers' attention | शेताच्या बांधावर जाऊन अजित पवारांनी साधला शेतक-यांशी संवाद, हुरडा खाऊ घालून शेतकऱ्यांनी केले स्वागत

शेताच्या बांधावर जाऊन अजित पवारांनी साधला शेतक-यांशी संवाद, हुरडा खाऊ घालून शेतकऱ्यांनी केले स्वागत

Next

परभणी:  राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेत केवळ सभांच्या माध्यमातून नव्हे तर विविध माध्यमातून नेते शेतक-यांशी संवाद साधत असून आज तर शेतक-यांच्या बांधावर जाऊन हुरडा खात संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून जात आहे.

हल्लाबोल यात्रेचा आजच्या आठव्या दिवशी परभणी जिल्ह्यात पाथरी, सेलू येथे सभा होत आहे. हल्लाबोलच्या पहिल्या सभेपासून राष्ट्रवादीचे सर्व नेते शेतकऱ्यांचे प्रश्नांना वाचा फोडत आहेत. पण आज अजित पवार यांनी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन शेतक-यांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना हुरडा खाऊ घालत शेतकर्‍यांनी अजितदादा, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांचे स्वागत केले. 
सध्या शेतकऱ्यांवर बोंड अळी, कर्जमाफी, हमीभाव, भरमसाठ वीज बिल वसुली... अशा नाना अडचणी सतावत आहेत. या प्रश्नावर आज संवाद साधला. अजितदादा, तटकरे, मुंडे व इतर नेते सरकारवर तुटून पडत आहेत. पण त्याचवेळी तुटून पडलेल्या शेतकर्‍यांना आधार देण्यासाठी थेट बांधावर जाऊन त्याला दिलासा देत असल्याचे चित्र यावेळी पाथरी येथे पाहायला मिळाले. सेलूचे आ. विजय भांबळे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे उपस्थित होते. या नेत्यांच्या संवादामुळे शेतकरी वर्ग भारावून गेला.

Web Title: Ajit Pawar visits farmers 'farm, welcomes farmers' attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.