शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

भीषण आगीच्या दोन घटनांनी पिंपरी चिंचवड परिसर होरपळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 7:45 PM

भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणी कॉर्नर येथे सेंच्युरी एंका कंपनी आहे.

पिंपरी : भोसरी एमआयडीसीतील एका कंपनीसह पिंपरीतील एका मोबाईलच्या दुकानाला मंगळवारी आग लागली. एकाच दिवसांत घडलेल्या या आगीच्या दोन घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भोसरी एमआयडीसीतील इंद्रायणी कॉर्नर येथे सेंच्युरी एका कंपनी आहे. या कंपनीतील एका प्लँटला सकाळी १० वाजून २० मिनिटांनी अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. याबाबत अग्निशामक दलाला माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यामध्ये महापालिकेच्या संत तुकाराम अग्निशामक केंद्राच्या चार तसेच भोसरी, तळवडे, प्राधिकरण येथील गाड्यांसह चाकण एमआयडीसी, टाटा मोटर्स, बजाज, आणि सेंचुरी एन्का कंपनीच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या. येथे मोठ्याप्रमाणात धूर असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना काहीसा त्रास झाला. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. 

    तर दुसरी घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपरी येथील साई चौकातील आनंद मोबाईल शॉपी येथे घडली. मंगळवारमुळे मार्केट बंद असल्याने मोबाईलचे दुकानही बंद होते. दरम्यान, दुपारी साडेबाराच्या सुमारास दुकानातून अचानक मोठ्याप्रमाणात धूर बाहेर येवू लागल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर नागरिकांनी तातडीने याबाबत अग्निशामक दलाला माहिती दिली. काही वेळातच अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. पॅनल बोर्डमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने दुकानाला आग लागल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.     उपअग्निशामक अधिकारी अशोक कानडे, ऋषिकांत चिपाडे, संदीप जगताप, फायरमन प्रतिक कांबळे, अशोक बर्वे, महेंद्र फाटक, विशाल जाधव, चैतन् माने, नामदेव शिंगाडे, सुरज गवळी, विठ्ठल भुसे, अमोल खंदारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल