पिंपरी चिंचवड : पूर्णानगरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या,24 तासांतील दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 08:31 AM2018-03-13T08:31:20+5:302018-03-13T08:32:40+5:30

शाहू नगर येथे आरटीओ मागील पूर्णानगर परिसरात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याने धारधार शास्त्राने गळा, मान व  डोक्यात सपासपा वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Pimpri Chinchwad: 10th standard student brutally killed in Purnaagar | पिंपरी चिंचवड : पूर्णानगरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या,24 तासांतील दुसरी घटना

पिंपरी चिंचवड : पूर्णानगरमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या,24 तासांतील दुसरी घटना

googlenewsNext

पिंपरी-चिंचवड (वाकड) : शाहू नगर येथे आरटीओ मागील पूर्णानगर परिसरात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यावर टोळक्याने धारधार शास्त्राने गळा, मान व  डोक्यात सपासपा वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.  सोमवारी (12 मार्च) मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वेदांत भोसले (वय 16 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.  पूर्णानगर येथील चौकात वेदांत एकटाच असल्याचे पाहून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. या टोळक्याने त्याच्या गळा, डोके व मानेवर सपासप वार केल्याने वेदांत गंभीर जखमी झाला. प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पाहताच त्यांनी मदतीसाठी वेदांतच्या दिशेनं धाव घेतली, त्यावेळी आरोपींनी तेथून पळ काढला. 

अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर वेदांतच्या मित्रांनी खासगी वाहनातून त्याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र  डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वेदांत त्रिवेणी नगर निगडी येथील अमृता विद्यालयात इयत्ता दहावीत शिकत होता. त्याची दहावीची परीक्षा सुरू होती. दरम्यान, त्याची हत्या का करण्यात आली? यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. पोलीस याप्रकरणी सखोल चौकशी करत आहेत.

दरम्यान, फत्तेचंद जैन महाविद्यालयात किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यावर खूनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच 24 तासांच्या आत ही दुसरी घडली आहे.
 

Web Title: Pimpri Chinchwad: 10th standard student brutally killed in Purnaagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.