शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील ४७ अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्यभरातून ६८ अधिकाऱ्यांची शहरात नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:06 IST

राज्याचे अपर पोलिस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी मंगळवारी तसे आदेश दिले आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सहा पोलिस निरीक्षक, नऊ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३२ पोलिस उपनिरीक्षक अशा ४७ अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या विविध भागांतून ६८ अधिकारी पिंपरी-चिंचवड पोलिस दलात आले आहेत. त्यामध्ये १२ पोलिस निरीक्षक, २२ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३४ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. राज्याचे अपर पोलिस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह यांनी मंगळवारी तसे आदेश दिले आहेत.

वाकडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांची ठाणे शहर येथे बदली झाली. फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांची ठाणे येथून पिंपरी-चिंचवड पोलिस दलात बदली झाली होती. पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांची गुन्हे अन्वेषण विभाग, विश्वजित खुळे यांची तुरचीतील पोलिस प्रशिक्षण केंद्र, देवेंद्र चव्हाण यांची खंडाळ्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. पोलिस निरीक्षक सतीश नांदुरकर आणि सुनील पिंजण यांना एक वर्ष मुदतवाढ मिळाली आहे.

पोलिस निरीक्षक महेश पाटील (मुंबई शहर), दत्तात्रय चासकर (राज्य पोलिस नियंत्रण कक्ष, मुंबई), राहुल सोनवणे (वर्धा), राजेंद्र पाटील (सिंधुदुर्ग), जगन्नाथ जानकर (नाशिक शहर), नरेंद्र ठाकरे (बुलढाणा), विजयानंद पाटील (पुणे शहर), संजय नरावाड (पुणे शहर), संजय सोळंके (यवतमाळ), दौलत जाधव (अहिल्यानगर), सुदाम पाचोरकर (एसीबी), महादेव कोळी (मुंबई शहर) यांची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात बदली झाली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील नऊ सहायक पोलिस निरीक्षकांची बदली झाली आहे. सहायक निरीक्षक रत्नमाला सावंत, श्रीराम शिंदे यांच्यासह २२ सहायक निरीक्षक शहरात आले आहेत. विविध कारणांमुळे चर्चेत असलेले पोलिस उपनिरीक्षक मीलन कुरकुटे तसेच सोशल मीडियावरील एका गेममध्ये करोडपती झालेले सोमनाथ झेंडे यांच्यासह ३२ उपनिरीक्षकांची बदली झाली आहे. ३० पोलिस उपनिरीक्षक पिंपरी-चिंचवड पोलिस दलात आले आहेत. यामध्ये गडचिरोली येथून येणाऱ्या १७ जणांचा समावेश आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारी