शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

प्रभाग लोकसंख्या ४९ ते ५९ हजार; २०१७ च्या प्रभागांत काहीसा बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 10:05 IST

- महापालिकेच्या निवडणुकीसाठी चार सदस्यीय पद्धतीच्या प्रभाग रचनेकरिता तयारी झाली सुरू : राज्य शासनाने आदेश दिल्यानंतर पालिका निवडणूक विभाग लागला कामाला, कर्मचाऱ्यांची बैठक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची २०१७ मधील चार सदस्यीय पद्धतीची प्रभाग रचना तयार आहे. आगामी निवडणूक याच पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे २०१७ च्या प्रभाग रचनेत थोडेसे बदल केले जातील. प्रभाग रचना कायम राहणार असल्याने एका प्रभागात ४९ ते ५९ हजार लोकसंख्या असण्याचीही शक्यता निवडणूक विभागातील सूत्रांनी वर्तवली आहे.महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपला. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम, राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडी, ओबीसी आरक्षणाचा न्यायप्रविष्ट मुद्दा अशा विविध कारणांमुळे निवडणूक तीन वर्षांपासून लांबणीवर पडली होती. राज्य शासनाने मंगळवारी प्रभाग रचना करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानंतर निवडणूक विभाग कामाला लागला आहे. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आढावा घेतला. अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक झाली. प्रभाग रचनेबाबत चर्चा करत प्रगणक गटाची मांडणी करून प्रारूप प्रभाग रचनेला सुरुवात होणार आहे.या कर्मचाऱ्यांचा असणार समावेशप्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाणार आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ तसेच आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांचा समावेश करावा, असे आदेशात नमूद केले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ आहे. त्यानुसार ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत १७ लाख लोकसंख्येसाठी महापालिकेत १२८ नगरसेवक आणि ३२ प्रभाग होते. त्याप्रमाणे यावेळीही तेवढेच असणार आहेत. प्रभाग रचनेवरून भाजप-राष्ट्रवादीमध्ये जुंपणार?२०१७ च्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करताना भाजपने पक्षासाठी फायद्याची ठरणारी आणि सोयीने प्रभागरचना केल्याचा आरोप झाला होता. महामार्ग, मुख्य रस्ते, गल्ल्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली होती. त्यामुळे त्या प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना आल्या होत्या. मात्र, हरकती आणि सूचनांना निवडणूक विभागाने केराची टोपली दाखवली. यावेळी प्रभाग रचनेवरून महायुतीतील भाजप-राष्ट्रवादीमध्येच जुंपण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. २०१७ मधील पक्षीय बलाबलभाजप - ७७राष्ट्रवादी काँग्रेस - ३६शिवसेना - ९मनसे - १अपक्ष - ६

महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी वेळ, मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. २०१७ प्रमाणेच प्रभाग रचना करण्यात येणार असून, एका प्रभागात ४९ ते ५९ हजार लोकसंख्या असण्याची शक्यता आहे. - अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, महापालिका

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक 2024PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे