शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad : बेशिस्त वाहनचालकांनो, तुमच्यावर आता सजग नागरिकांची नजर...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:02 IST

वाहतूक पोलिसांच्या ‘ट्राफिक बडी’ व्हॉट्सॲप तक्रार प्रणालीवर नागरिकांनी केल्या दहा हजार तक्रारी 

- रवींद्र जगधने

पिंपरी : शहरातील रस्त्यांवर वाहतूक पोलिस नसले तरी आता बेशिस्त वाहनचालकांना मोकळे रान मिळणार नाही. कारण सजग नागरिक थेट व्हॉट्सॲपद्वारे त्यांच्या उल्लंघनाची तक्रार पोलिसांकडे करू शकतात. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी सुरू केलेल्या ‘ट्राफिक बडी’ या व्हॉट्सॲप चॅटबॉट प्रणालीने हे शक्य झाले आहे. याप्रणालीद्वारे सोमवारपर्यंत (दि. १६) नऊ हजार ८७२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

ही प्रणाली स्थान-आधारित असल्याने खोट्या तक्रारी टाळता येतात आणि नागरिकांना त्यांच्या तक्रारीवर घेण्यात येणाऱ्या कारवाईची माहितीही मिळते. ट्राफिक बडी ही एक सोपी व्हॉट्सॲप-आधारित चॅटबॉट प्रणाली आहे. १७ जुलै २०२५ मध्ये सुरू झालेली ही सुविधा आता पूर्णपणे कार्यान्वित आहे. नागरिक ८७८८६४९८८५ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करतात. प्रणाली स्थान-आधारित (लोकेशन-बेस्ड) असल्याने तक्रारदाराच्या स्थानाची पडताळणी होते. तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांकडून त्वरित प्रतिसाद मिळतो आणि कारवाई सुरू होते.

कोणत्या प्रकारच्या तक्रारी करता येतात?

याप्रणालीद्वारे वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्डे किंवा खराब रस्ते, सिग्नल तोडणे, हेल्मेट न घालणे, अवैध पार्किंग अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास तक्रार करता येते. या व्यतिरिक्त, रस्त्यावरील अडथळे किंवा इतर सुरक्षा-संबंधित मुद्देही नोंदविता येतात. ही प्रणाली फक्त वाहतूक विभागाशी संबंधित आहे, म्हणजे गुन्हेगारी किंवा इतर प्रकारच्या तक्रारी येथे स्वीकारल्या जात नाहीत.

कशी तक्रार करावी?

तक्रार करणे अगदी सोपे आहे. फक्त ८७८८६४९८८५ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा आणि ‘हाय’ किंवा ‘हॅलो’ असा मेसेज पाठवा. त्यानंतर चॅटबॉट तुम्हाला पर्याय देतो. जसे की तक्रार नोंदवणे, स्थिती जाणून घेणे किंवा सूचना देणे. तक्रार नोंदविताना फोटो, व्हिडीओ किंवा लोकेशन शेअर करा. प्रणाली तुम्हाला तक्रारीचा आयडी देते आणि कारवाईची अपडेट्स पाठवते. या सुविधेसाठी ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही, फक्त व्हॉट्सॲप असणे पुरेसे आहे.

या तक्रारी होतात नामंजूर

सर्व तक्रारी स्वीकारल्या जात नाहीत. स्थान-आधारित प्रणालीमुळे खोटी माहितीच्या तक्रारी नामंजूर होतात. तक्रारदार घटनास्थळी नसल्यास किंवा पुरावा (फोटो / व्हिडीओ) नसल्यास तक्रार रद्द केली जाते. तसेच, वाहतूक व्यतिरिक्तच्या तक्रारी नामंजूर होतात. अशा एक हजार ८५५ तक्रारी नामंजूर झाल्या आहेत.

रस्त्याची तक्रार महापालिकेकडे

रस्ते खराब असणे, खड्डे किंवा इतर दुरुस्ती-संबंधित तक्रारी ट्राफिक बडीद्वारे स्वीकारल्या जातात, पण त्या पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे पाठवल्या जातात. पोलिस महापालिकेशी समन्वय साधून दुरुस्ती करून घेतात. समस्या सुटली नाही तर मासिक फॉलो-अप घेतले जाते. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी तक्रार करून उपाय मिळतो. रस्त्यांसंदर्भात ३२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

ट्राफिक बडी ही स्थान-आधारित प्रणाली आहे. ही राज्यातील पहिली योजना आहे. ही प्रणाली शहरातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरत आहे. सजग नागरिकांनी याचा सक्रिय वापर करावा. - विवेक पाटील, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड पोलिस

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad: Vigilant citizens now monitor unruly drivers via WhatsApp!

Web Summary : Pimpri-Chinchwad police's 'Traffic Buddy' WhatsApp chatbot lets citizens report traffic violations. The location-based system ensures accountability. Over 9,872 complaints received, with quick police response. Citizens report issues like traffic jams, potholes, and illegal parking, improving traffic management.
टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रTrafficवाहतूक कोंडी