शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

पाऊस आला धावून, उद्योगनगरीतील रस्ते गेले वाहून..!प्रशासन म्हणतंय पाऊस उघडल्यावर खड्डे दुरुस्तीचे पाहू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 16:05 IST

महापालिका झटकतेय हात : पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर खोदकाम करू नये, असा आदेश काढला असतानाही खोदकाम सुरूच; विद्युत, ड्रेनेज, पाणीपुरवठा, महामेट्रो, स्थापत्य विभागाकडून खोदाई कायम; खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून चिखल, दररोज होताहेत छोटे-मोठे अपघात  

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून चिखल होत आहे. खड्यांचा अंदाज न आल्याने वाहनचालक गोंधळून जात आहेत. खड्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. पाऊस असल्याने सध्या तरी खड्यांची दुरुस्ती केली जाणार नाही, असे महापालिकेने सांगत हात झटकले आहेत.पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर खोदकाम करू नये, असा आदेश महापालिकेने काढला होता. मात्र, १५ मे नंतरही शहरातील काही भागांत खोदकाम सुरूच आहे. पाणीपुरवठा, विद्युत, ड्रेनेज, स्थापत्य, शहरी दळणवळण, स्मार्ट सिटी, इतर काही विभागांकडून तसेच, महामेट्रोकडून रस्ते व पदपथ खोदाई कायम आहे. मोशी, तळवडे, रावेत, किवळे, चिखली, आकुर्डी, थरमॅक्स चौक, देहू-आळंदी रस्ता, भोसरी, दळवीनगर, चिंचवड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, दापोडी, सांगवी, कासारवाडी, निगडी, प्राधिकरण, पिंपरी, काळेवाडी, रहाटणी, एमआयडीसी भागांत रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहेत.

मे महिन्याच पाऊस पडल्याने महापालिका हैराण...महापालिकेच्या वतीने दरवर्षी पहिला पाऊस पडल्यानंतर जूनच्या १५ तारखेनंतर रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली जाते. डांबरीकरण, काँक्रीट, पेव्हिंग ब्लॉकद्वारे खड्डे बुजविले जातात. मात्र, यंदा मे महिन्यातच मुसळधार पाऊसासह मान्सून सुरू झाल्याने महापालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला आहे. तत्काळ रस्ते दुरुस्ती कशी करायची, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. बदलेल्या मॉन्सूनमुळे महापालिकेचे दरवर्षीचे धोरण बदलावे लागणार नाहीत.

ग्रेड सेपरेटरमध्येही कामे सुरूग्रेड सेपरेटरमध्ये नाशिक फाटा तसेच निगडी परिसरात मेट्रोचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे सिग्नल टाळून ग्रेड सेपरेटरमधून थेट देहूरोडला निघण्याचा विचार करणाऱ्या वाहनचालकांना ग्रेड सेपरेटरमधून प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यात अवजड वाहनांमुळे कोंडीमध्ये भर पडत आहे.  नव्याकोऱ्या रस्त्याची पुन्हा केली खोदाई

कासारवाडी येथील शंकरवाडी रस्त्याचे मागील एक वर्षापासून सुरू असलेले काम नुकतेच पूर्ण झाले होते. तोच महापालिकेकडून या नव्याकोऱ्या रस्त्याची दुरुस्तीसाठी पुन्हा खोदाई केली.

ग्रेडसेपरेटर मार्गावर मेट्रोकडून खड्डे

महामेट्रोच्या कामामुळे दापोडी ते कासारवाडी मार्गावरील ग्रेडसेपरेटर मार्गाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे चांगले काँक्रिटवे रस्त्यांना भेगा पडल्या. अनेक ठिकाणी खड्डे पडले. २ काँक्रीटचे रस्ते दुरुस्त करण्याचे काम महामेट्रोकडून शंकरवाडी, कासारवाडी येथे सुरू कासव गतीने सुरू आहे. त्यासाठी ग्रेडसेपरेटरमधील एक लेन वाहतुकीस बंद केली आहे. त्यामुळे तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. तसेच, पिंपरी मेट्रो स्टेशनच्या खाली काम सुरू असल्याने वाहतूक अडथळा होत आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहने घसरून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पावसाने उघडीप दिल्याने गुरुवार (दि. २९) काही भागांतील रस्ते दुरुस्तीस सुरुवात करण्यात आली आहे. या पुढे पाऊस थांबल्यानंतर तातडीने दुरुस्ती काम केले जाईल. दरवर्षी हे दुरुस्ती कामाची सुरुवात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून केली जात होती. यंदा हे काम लवकर सुरू करण्यात आले आहे. - मकरंद निकम,शहर अभियंता, महापालिका 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेRainपाऊसroad safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिका