शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कारण-राजकारण : पिंपरी-चिंचवड महापालिकेतल्या सत्तेची झूल,भूल आणि हूल...

By श्रीनिवास नागे | Updated: October 1, 2025 11:56 IST

राज्यात दादांच्या घड्याळाचा सर्वाधिक गजर पिंपरी-चिंचवड महापालिकेत होऊ शकतो, अशी अटकळ त्यात बांधलीय म्हणे! झालं... चक्र फिरू लागली.

- श्रीनिवास नागेमागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडत होता. त्यादरम्यान अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी ‘स्मार्ट’ बनत होती. सगळा पक्ष गुलाबी रंगात न्हाऊन निघत होता. गुलाबी जॅकेटमधल्या दादांची ‘एंट्री’ तर झोकात होत होती. पक्षाच्या वाटचालीसाठी नेमलेल्या कंपनीचा सल्लाच तसा होता. बक्कळ म्हणता येतील, एवढ्या ४१ जागा मिळाल्या. दादा पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. आता त्याच कंपनीनं नवा सर्व्हे दिलाय म्हणे. राज्यात दादांच्या घड्याळाचा सर्वाधिक गजर पिंपरी-चिंचवड महापालिकेत होऊ शकतो, अशी अटकळ त्यात बांधलीय म्हणे! झालं... चक्र फिरू लागली. पायाला भिंगरी बांधलेल्या दादांची पायधूळ या उद्योगनगरीत पुन:पुन्हा झडू लागली.

पिंपरी-चिंचवड शहरात अजितदादांची थेट ‘एंट्री’ झाली १९९१ मध्ये. खासदार म्हणून. तेव्हा, शहरावर काँग्रेसच्याच प्रा. रामकृष्ण मोरेंचा वरचष्मा होता. त्यामुळे पक्षात दोन-दोन सत्ताकेंद्र तयार झाली. दादांनी मोरेंना बाजूला करून महापालिका स्वत:च्या ताब्यात घेण्यासाठी पद्धतशीर पावले टाकली. त्याचा पहिला प्रत्यय आला १९९३ मधल्या महापौर निवडीवेळी. दादांच्या पाठबळावर विलास लांडे अवघ्या तीन मतांनी महापौर झाले. अर्थात बारामतीच्या काकांच्या अदृश्य हाताची रसद होतीच, तेव्हापासून दादांनी कार्यकर्त्यांचे जाळे उभे करण्यास सुरुवात केली. ताकदीचे मोहरे आपल्याकडे ओढले. कामांचा फडशा पाडणं, दांडगा जनसंपर्क आणि वैयक्तिक ओळखी ही दादांची बलस्थानं. पुढं १९९९ मध्ये राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर २००२ मध्ये महापालिकेत थेट काँग्रेसशी सामना. राष्ट्रवादीनं १०५ पैकी ३६, तर काँग्रसनं मोरेंच्या नेतृत्वाखाली ३२ जागा जिंकल्या. सत्तेसाठी नाईलाजानं दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या.२००३ मध्ये रामकृष्ण मोरेंचं निधन झालं. मग तिकडची तगडी मंडळी दादांकडं आली. नंतर २००७ आणि २०१२ मधल्या महापालिका निवडणुकांत दादांनी विरोधकांना नेस्तनाबूत केलं. दणदणीत बहुमतामुळं दादा म्हणतील तीच पूर्वदिशा असं चित्र तयार झालं. एकहाती कारभार. पुढं त्यांच्याच शिलेदारांनी ‘घड्याळ’ काढून टाकून हाती ‘कमळ’ घेतलं आणि २०१७ च्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीला विरोधी बाकावर बसावं लागण्याची वेळ आली.दादांकडून भाजपकडं गेलेल्या लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या दोघा आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर दादांच्या गटाला जेरीस आणलं. उद्योगनगरीतले प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, बडे प्रकल्प, बारा किलोमीटरचा दापोडी-निगडी हमरस्ता दादांच्याच सत्ताकाळात झालेले. ते सगळं मागं पडलं....

पण आता त्याच कामांचा इतिहास आणि वर्तमानातला सर्व्हे दादांना सत्तेची ‘झूल’ चढवण्याची ‘भूल’ देऊ लागलाय. महापालिका निवडणका महायुतीतून भाजप-शिवसेनेसोबत लढवण्यापेक्षा स्वतंत्र लढण्याची ‘हूल’ त्यातूनच उठवून दिली गेली असावी बहुधा. सत्तेतून बाहेर फेकल्याच्या रागाचा अंमल अजून आहे. भरीस भर म्हणजे, राष्ट्रवादी फुटल्यानंतर ‘मनी’ आणि ‘मसल’ पॉवरवाले शिलेदार दादांकडेच राहिले. काही ‘तुतारी’ फुंकून परत आले. त्या सगळ्यांनी आता दादांना आपापलं ‘इलेक्टिव्ह मेरिट’ दाखवण्याचा आटापिटा सुरू केलाय.

पण दादाही हुश्शार..! ते स्वत: प्रत्येकाचं ‘इलेक्टिव्ह मेरिट’ जोखून घेऊ लागलेत. ‘राष्ट्रवादी परिवार मीलन’ हे मेरिट मोजण्याचं पहिलं माप. नंतर २०१७ पासूनचा सगळ्यांच्या कामाचाही ‘सातबारा’ मोजला जाणार. मग बाकीच्या पक्षांची ताकद अजमावणार. हे सगळं मोजूनमापून झालं की ठरणार, सत्तेची ‘झूल’ चढवण्यासाठी महायुतीची गाडी जुंपायची की आपापली स्वतंत्र पळवायची..!  

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Politics: Power, Illusion, and Deception in Municipal Corporation

Web Summary : Ajit Pawar eyes Pimpri-Chinchwad again, fueled by a favorable survey. He aims to regain control of the Municipal Corporation, assessing candidates and strategies for a potential independent fight or alliance to reclaim power.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAjit Pawarअजित पवार