शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

प्रभागरचना तयार करण्याचे आदेश; शहरात प्रभाग ३२, नगरसेवक १२८

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:27 IST

- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेस गती : चारसदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणूक; २०११च्या जनगणनेवेळी असलेल्या १७ लाख २९ हजार ६९२ लोकसंख्येनुसार प्रभागरचना होणार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक चारसदस्यीय प्रभागरचनेनुसार होणार आहे. २०११च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार प्रभागरचना करावी, असे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे शहरात प्रभाग संख्या ३२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १२८ राहणार आहे.

महापालिकेची मुदत २२ मार्च २०२२ रोजी संपली. त्याअगोदर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना एक, दोन आणि तीनची होणार यावर चर्चा झाली. अखेर महाविकास आघाडी सरकारने चारसदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आरक्षण सोडत घेऊन प्रभागरचनाही जाहीर केली.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. २०११च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार प्रभागरचना करण्याचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट गावांसह २०११ मधील जनगणना १७लाख २९ हजार ६९२ होती. त्यानुसार प्रभागाची संख्या ३२ राहणार असून, नगरसेवकांची संख्या १२८ राहणार आहे.

प्रभागरचनेची मार्गदर्शक तत्त्वे पाळण्यावर लक्ष राहणारप्रभागरचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभागरचना करत सरकावे. शेवट दक्षिणेत करावा. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत. प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी. प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर आदी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावी.

इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजे. सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हे नंबर यांचे उल्लेख प्रामुख्याने यावयास हवेत. प्रभागातील वस्त्यांचे शक्यतोवर विभाजन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.जनगणना न होण्याचा असाही फटकाकोरोनामुळे जनगणना झाली नाही. त्यामुळे २०११ ची लोकसंख्या गृहित धरली जाणार आहे. त्याचा फटका नगरसेवकांच्या संख्यावाढीला बसणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १७ लाख २९ हजार आहे. सध्याची मतदारसंख्या १४ लाख ८८ हजार १२९ आहे, पण मतदारांची नोंदणी सुरू आहे. त्यामुळे कदाचित ती वाढू शकणार आहे.

प्रभागरचना ठरवण्याची अशी होणार प्रक्रियाप्रारूप प्रभागरचना तयार करून राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करावी. त्यानंतर प्रारूप प्रभागरचनेला मान्यता देण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यावर असेल. प्रारूप प्रभागरचना आयुक्तांनी प्रसिद्ध करावी.

त्यावर प्राप्त हरकती व सूचनांवर 3 सरकारने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर अंतिम केलेल्या प्रभागरचनेचा प्रस्ताव निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे. निवडणूक आयोग प्रभागरचनेला मान्यता देणार आहे.

आयुक्त अध्यक्षप्रारूप प्रभागरचनेसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली जाईल. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राची संपूर्ण माहिती असलेला अधिकारी, प्रभागरचनेशी संबंधित नेमलेला अधिकारी, नगररचनाकार, संगणकतज्ज्ञ, आवश्यकतेनुसार अधिकारी यांचा समावेश असेल.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेElectionनिवडणूक 2024