पिंपरी : महापौर रवी लांडगे यांच्यासह दहा नगरसेवकांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेतला आहे. महापौर लांडगे यांच्या जातप्रमाणपत्राबाबत जातपडताळणी समितीकडे शुक्रवारी सुनावणी होणार असून, तक्रारकर्ते मृणाल ढोले यांना सुनावणीसाठी बोलाविले आहे. त्यामुळे महापौरांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी कुणबी दाखल्याच्या आधारे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून निवडणूक लढविली आहे. यामध्ये महापौर लांडगे यांच्यासह भाजपचे नगरसेवक हर्षल ढोरे, ज्ञानेश्वर जगताप, तानाजी बारणे, नगरसेविका आरती चौंधे, रेखा देवकर, अर्चना करंडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगरसेविका मनीषा लांडे, नगरसेवक विकास साने आणि शिंदेसेनेचे विश्वजीत बारणे हे दहा नगरसेवक कुणबी दाखल्याच्या आधारे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. या दहाजणांच्या कुणबी दाखल्याबाबत पुण्यातील मृणाल ढोले-पाटील यांनी आक्षेप घेतला आहे.
मृणाल ढोले-पाटील म्हणाले, ७० ते ७५ टक्के ओबीसी आरक्षण मराठा समाजाने गिळकृंत केले आहे. राज्य सरकार अशा लोकांच्या पाठीशी राहत असल्यामुळे ओबीसींवर अन्याय होत आहे. जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने योग्य पद्धतीने सुनावणी घ्यावी. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी ठामपणे लढा देणार आहे.
माझ्या दाखल्यावर हिंदू-कुणबी असा उल्लेख आहे. त्याचे सर्व पुरावे आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण नाही. - रवी लांडगे, महापौर, महापालिका
Web Summary : Objections filed against caste certificates of Pimpri-Chinchwad's mayor and ten corporators elected under OBC quota. Hearing scheduled; mayor claims valid Hindu-Kunbi certificate. Complainant alleges injustice to OBCs due to Maratha dominance in reservation.
Web Summary : पिंपरी-चिंचवड के महापौर और दस पार्षदों के जाति प्रमाण पत्रों पर आपत्ति दर्ज। सुनवाई निर्धारित; महापौर का दावा है कि उनके पास वैध हिंदू-कुणबी प्रमाण पत्र है। शिकायतकर्ता ने आरक्षण में मराठा वर्चस्व के कारण ओबीसी के साथ अन्याय का आरोप लगाया।