शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

श्री संत तुकाराम साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोधकडे ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:47 IST

- निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून दुजोरा नाही, आज चित्र स्पष्ट होणार

चांदखेड : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विक्रमी २२६ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीमध्ये ५ अर्ज बाद झाले, तर २६ उमेदवारांनी दुबार अर्ज भरल्याने काढण्यात आले. छाननीनंतर १९५ उमेदवार रिंगणात राहिले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख मंगळवारी (दि. २५) होती.परंतु, उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने रात्री उशिरापर्यंत किती उमेदवारी अर्ज माघारी घेतले व किती उमेदवारी अर्ज रिंगणात शिल्लक राहिले? यावर काम चालू असल्याने अधिकृत माहिती बुधवारी (दि. २६) देणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही निवडणूक बिनविरोध झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. संचालकांची अधिकृत यादी बुधवारी जाहीर होईल, अशी चर्चा परिसरामध्ये सुरू आहे. नव्या संचालक मंडळामध्ये नवीन १६ चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब ऊर्फ विदुरा नवले यांच्या नेतृत्वामध्ये संचालक मंडळाच्या २१ जागेसाठी जुन्या नव्यांचा समन्वय साधत सर्वपक्षीय उमेदवारांच्या श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची माजी खासदार व कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश घुले यांच्या सह्या असलेली यादी जाहीर करण्यात आलेली आहे.यादीमध्ये २१ संचालकांमध्ये संस्थापक अध्यक्ष नानासाहेब तथा विदुरा विठोबा नवले, विद्यमान उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ज्येष्ठ संचालक माऊली दाभाडे, चेतन भुजबळ, अनिल लोखंडे, आदी पाच संचालकांना पुन्हा संधी देण्यात आलेली असून, १६ नवीन चेहऱ्यांना यावेळी संचालक म्हणून संधी दिली आहे.हिंजवडी- ताथवडे गटविदुराजी विठोबा नवलेचेतन हुशार भुजबळदत्तात्रय गोपाळ जाधवपौड - पिरंगुट गटधैर्यशील रमेशचंद्र ढमालेयशवंत सत्तू गायकवाडदत्तात्रय शंकरराव उभेतळेगाव- वडगाव गटबापुसाहेब जयवंतराव भेगडेज्ञानेश्वर सावळेराम दाभाडेसंदीप ज्ञानेश्वर काशीदसोमाटणे - पवनानगर गटछबुराव रामचंद्र कडूभरत मच्छिंद्र लिम्हणउमेश बाळू बोडकेखेड- शिरूर हवेली गटअनिल किसन लोखंडेविलास रामचंद्र कातोरेअतुल अरुण काळजेधोंडिबा तुकाराम भोंडवेमहिला राखीवज्योती केशव अरगडेशोभा गोरक्षनाथ वाघोलेअनुसूचित जाती / जमाती-लक्ष्मण शंकर भालेरावइतर मागासवर्ग-राजेंद्र महादेव कुदळेविमुक्त जाती/भटक्या जमाती - शिवाजी हरिभाऊ कोळेकर

श्री संत तुकाराम कारखाना संचालक मंडळ निवडणुकीसाठी छाननीनंतर १९५ उमेदवारी अर्ज दाखल होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गठ्ठ्याने अर्ज आल्याने, रात्री उशिरापर्यंत उमेदवारी माघारी घेण्यात आलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू होती. कामकाज पूर्ण न झाल्याने बुधवारी (दि. २६) कामकाज पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीबाबत चित्र स्पष्ट होईल.  - मुकुंद पवार, निवडणूक निर्णय अधिकारी 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस