शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून माझे आयुष्य संपवतो..! पती - पत्नीने उचलले टोकाचे पाऊल; नेमकं कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 18:19 IST

पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातील घटनेमुळे खळबळ

पिंपरी : पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे त्याच्याजवळच पत्नी मृतावस्थेत आढळली. या घटनेने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली. पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. नवी सांगवी येथील शिवनेरी काॅलनी येथे गुरुवारी (दि. २४ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.शाम जग्गू वाघेला (वय ५६) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव असून, त्यांची पत्नी राजश्री शाम वाघेला (वय ४५) यांचा मृतदेह घरात आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघेला दाम्पत्य नवी सांगवी येथील शिवनेरी काॅलनीतील घरी दोघेच राहत होते. त्यांना दोन विवाहित मुली आहेत. राजश्री वाघेला या पिंपरीगाव येथील शाळेत शिक्षिका होत्या तर शाम वाघेला हे रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या कार्यालयात नोकरी करत होते.

शाम वाघेला हे पत्नी राजश्री यांच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होते. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने वाद व्हायचे. त्याच कारणावरून बुधवारी (दि. २३ जुलै) रात्री उशिरा दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता. त्यावेळी राजश्री वाघेला यांनी आपल्या मुलीला फोन करून याबाबत माहिती दिली होती. ‘उद्या सकाळी येऊन भेटते’, असे मुलीने सांगितले होते.दरम्यान, गुरुवारी सकाळी मुलगी सांगवी येथे वाघेला यांच्या घरी गेली. घराचा बंद होता. मुलीने दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने तिने इतर नातेवाईकांना व शेजाऱ्यांना बोलावले. दरवाजा तोडल्यावर समोरचे दृश्य अंगावर शहारा आणणारे होते. वडिलांनी घरातील छताच्या पंख्याला गळफास घेतलेला तर आई मृतावस्थेत आढळली. राजश्री यांच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे पोलिसांनी सांगितले.अहवालानंतर उलगडणार गुढ?शाम वाघेला आणि राजश्री वाघेला यांचा मृतदेह सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात मृतदेह हलविण्यात आले. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर राजश्री यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले.  ‘..म्हणून माझे आयुष्य संपवत आहे’शाम वाघेला यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी (सुसाइड नोट) त्यांच्या खिशात मिळून आली. पत्नी राजश्री हिचे अनैतिक संबंध आहेत. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे, अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

 शाम वाघेला यांनी गळफास घेतला आहे. त्यांची पत्नी मृतावस्थेत आढळली आहे. ही हत्या आहे की आणखी काही, याबाबत तपास सुरू आहे.- जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे (पिंपरी-चिंचवड)

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड