शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

पिंपरी-चिंचवडला यंदा लेजरमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिस सरसावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:43 IST

- निगडी येथे श्री मोरया पुरस्कारांचे वितरण : फिरता करंडक थेरगाव येथील विशाल मित्र मंडळास प्रदान; ‘डीजे’चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांवर भर देण्याचे आवाहन

पिंपरी : मागील वर्षी गणेशोत्सवात लेजरचा वापर झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे काही लोकांना आयुष्यभराचे अंधत्व आले आहे. लेजरमुळे डोळ्यांना झालेली इजा कधीही भरून येत नाही. त्यामुळे लेजर वापरू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी बुधवारी (दि. ६ ऑगस्ट) केले.सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्री मोरया पुरस्कार प्रदान सोहळा आणि आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक निगडी प्राधिकरणात झाली. यावेळी आयुक्त चौबे बोलत होते. महापालिका आयुक्त शेखर सिंह, सह पोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, विवेक पाटील, डॉ. शिवाजी पवार, संदीप आटोळे, विशाल गायकवाड उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून दिला जाणारा फिरता मोरया करंडक थेरगाव येथील विशाल मित्र मंडळाने मिळवला.चौबे म्हणाले की, गणेशोत्सव मंडळांना पोलिसांच्या परवानगीसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध केली आहे. मंडळांचे पदाधिकारी, मंडप मालक, मंडपाचा आकार याचीही माहिती द्यावी लागेल. धर्मादाय आयुक्तांचे नोंदणी प्रमाणपत्र, मागील वर्षीचे परवानगी पत्र, सार्वजनिक जागेवर असल्यास किंवा खासगी जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, वीज जोडणीचे ना हरकत प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे.

ते म्हणाले, मागील दोन वर्षांत पारंपरिक वाद्यांचा वापर वाढला असून डीजेचा वापर कमी झाला आहे. यंदाही डीजेचा वापर टाळा. लेजरमुळे काही लोकांना अंधत्व आले. त्यामुळे लेजर वापरू नये. मिरवणूक मार्गावर बेकायदेशीर पार्किंग होणार नाही, याची काळजी घेऊ. 

पुढील वर्षीपासून नवीन दोन पुरस्कारचांगल्या मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन वर्षांपासून मोरया पुरस्कारांची सुरुवात केली. आता १२ पुरस्कार दिले जात असून पुढील वर्षी आदर्श मिरवणूक आणि आदर्श देखावा असे दोन पुरस्कार वाढवले जाणार आहेत. 

महापालिकेकडूनही उपाययोजनाआयुक्त शेखर सिंह म्हणाले, अडथळा ठरणारे विजेचे खांब, वायर काढणे, रस्त्यांची दुरुस्ती करणार आहे. पीओपी मूर्ती लवकर विरघळण्यासाठी कृत्रिम हौदात विशिष्ट रसायन टाकून उपाययोजना करू. 

श्री मोरया पुरस्कार परिमंडळ एक

प्रथम - शरयू प्रतिष्ठान, प्राधिकरण निगडीद्वितीय - एसकेएफ गणेश मंडळ, चिंचवडतृतीय - मधुबन मित्र मंडळ, जुनी सांगवी परिमंडळ दोन

प्रथम - सिद्धीचा गणपती महिला मंडळ, बावधन

द्वितीय - शिवछत्रपती तरुण मंडळ, देहूरोड

तृतीय - कोकणे चौक मित्र मंडळ, काळेवाडी 

परिमंडळ तीनप्रथम - मयूर मित्र मंडळ, चाकणद्वितीय - नवयुग मित्र मंडळ, चाकणतृतीय - दक्षता तरुण मंडळ, चिखली 

पोलिस आयुक्तालय स्तरावरील पुरस्कार

प्रथम - विशाल मित्र मंडळ, थेरगाव

द्वितीय - शिवशंभो प्रतिष्ठान, मोशी

तृतीय - आझाद हिंद मंडळ, फुगेवाडी

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड