प्राधिकरण : निगडी येथील यमुनानगर वळणावरील फॉरमायका कंपनी आणि रुद्रा वाहनतळ सेवारस्त्यालगतच्या कडेला देशी, विदेशी व शोभिवंत अशा २५ झाडांवर कुऱ्हाड कोसळणार आहे. महापालिका उद्यान विभागाने पुनर्रोपणासंबंधी नोटिसा लावल्या आहेत. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नागरिकांकडून हरकती सूचना मागविल्या होत्या. वृक्षतोड करू नये, अशी मागणी पर्यावरणवादी संघटनांनी केली आहे.
निगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील प्राधिकरणच्या यमुनानगर कोपऱ्यावर प्रस्तावित मेट्रो स्टेशन होणार आहे. तेथील झाडे बाधित होणार असल्यााने, पर्यावरणवादी व वृक्षप्रेमी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. झाडे बचावासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. झाडांची चर्चा शहरात आहे.
मेट्रो स्टेशन प्रवेशमार्गासाठी एमआयडीसी व महापालिकेला जागेसंदर्भात कळविले होते. याबाबतचा विषय प्रलंबित राहिल्याने पर्यायी विचार मेट्रोने सुरू केला होता. उद्यान विभागाने ठिकाणी २२ जुुलैला संबंधित झाडासाठी नोटिसा लावल्या होत्या. आता एमआयडीसीकडून प्रवेशमार्ग उभारणीसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. शहरात दिवसेंदिवस हरितक्षेत्र कमी होत आहे. एमआयडीसी जागेचा प्रश्न सुटला आहे. त्यामुळे वृक्षतोड होणार की नाही, अशी चर्चा शहरात आहे.
कार्बन उत्सर्जनामुळे प्रदूषण वाढत आहे. शहरी, ग्रामीण भागात प्रकल्प राबविताना वृक्ष बाधित होणार नाहीत असे प्रकल्पाचे नियोजन करावे. - धनंजय शेडबाळे, पर्यावरणवादी प्राधिकरणात मेट्रो स्टेशनसाठी एमआयडीसीकडून जागा मिळाली आहे. त्यामुळे अन्य जागेची गरज भासणार नाही. महापालिकेने नोटिसा लावलेली झाडे वाचणार आहेत. - अतुल गाडगीळ, संचालक (कार्य) मेट्रो प्रशासन