शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांची वरुणराजाच्या धो-धो बरसण्याने पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 18:54 IST

हिंजवडी फेज दोन, तीनमध्ये प्रमुख रस्ते, चौकांमध्ये पाणी साचून वाहतूक कोंडी, रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याने मंदावतोय वाहतुकीचा वेग, प्रशासन धडा घेणार का?, आयटियन्स, स्थानिकांचा उद्विग्न सवाल

- रोहिदास धुमाळहिंजवडी : मागील पंधरा दिवसांपासून हिंजवडी आयटी पार्क परिसरात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होत आहे, तर पावसामुळे रस्त्यांची अवस्था अधिक बिकट झाल्याने वाहतूकही मंदावली आहे. त्यामुळे आयटी पार्क परिसरात नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. अक्षरशः सर्वच प्रमुख मार्गावर सहा ते सात किमी वाहनांच्या रांगा लागत असल्याने स्थानिकांसह आयटियन्स येथील प्रशासनाबाबत रोष व्यक्त करत आहेत.

मे महिन्याच्या अखेर झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि सध्या सुरू असलेल्या जोरदार मान्सूनची हिंजवडीसह आयटी परिसरात दमदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे येथील प्रशासनाची उदासीनता तसेच, अनेक पायाभूत समस्या चव्हाट्यावर आल्या आहेत. वरुणराजाच्या धो-धो बरसण्याने हिंजवडी आयटी पार्क परिसरातील पायाभूत सुविधांच्या कामाची पोलखोल झाली असून, येथे कार्यरत प्रशासन यातून काही धडा घेणार की नाही? असा उद्विग्न सवाल आयटियन्ससह स्थानिक विचारत आहेत.

आयटी पार्क परिसरातील समस्या :

- बाराही महिने उखडलेले खड्डेमय रस्ते

- संथगतीने सुरू असलेले मेट्रो मार्गिकेचे काम

- रस्त्यावर लेन मार्किंगचा अभाव

- अवजड वाहनांची दिवसभर वर्दळ

- बेशिस्त वाहतूक

- वाहतूक पोलिसांचे अपुरे मनुष्यबळ

- नैसर्गिक नाले, ओढे, वगळ, चर झाले नष्ट

- नैसर्गिक जलप्रवाह मार्गावर अतिक्रमण

- चेंबर, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज चोकअप

- पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ठोस उपाययोजनांचा अभाव

- परिसरातील डोंगर, पठार विचारत न घेता केलेले रस्ते नियोजन.

- प्रशस्त आणि अतिक्रमणमुक्त सुरक्षित रस्ते.

- कार्यरत सर्व प्रशासकीय यंत्रणांचा एकमेकांशी समन्वयाचा अभाव. 

येथे साचतेय रस्त्यावर पाणी

आयटी पार्क फेज तीनकडील डोंगर पठार बाजूचे रस्ते, फेज तीन ते फेज दोनपर्यंत मुख्य रस्ता, फेज दोनजवळील पद्मभूषण चौक परिसर, घोटावडे-माण रस्त्यावरील गवारे मळा, माणदेवी चौक, राक्षे वस्ती, बोडकेवाडी फाटा, शिवचा ओढा, वडजाईनगर तसेच, बोडकेवाडी फाटा ते जॉय व्हिला सोसायटी रस्ता, धुमाळ वस्ती पाणंद रस्ता, हिंजवडी हद्दीतील भटेवारानगर, विनोदे वस्ती तसेच भूमकर चौक अंडर पास याठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून वाहतूक कोंडी होत असते.

प्रामुख्याने येथील वाहतूक कोंडी समस्यांवर लक्ष दिले गेले पाहिजे. येथील सर्व रस्ते बाराही महिने सुस्थितीत असणे गरजेचे आहे. तसेच, किमान रहदारीच्यावेळी प्रमुख मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचारी तैनात असणे गरजेचे आहे. - अनुप मोरे, आयटी अभियंता, हिंजवडी आयटी पार्क 

सुमारे ६० टक्के आयटी पार्कचा भाग माण ग्रामपंचायत हद्दीत येतो. एमआयडीसी हद्दीतील रस्त्यांची वाट लागली आहे. तेथील कचरा, सांडपाणी समस्यासुद्धा आहेत. प्रशासनाला अनेकदा पत्रव्यवहार करूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. - अर्चना आढाव, सरपंच, आयटीनगरी माण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसWaterपाणीhinjawadiहिंजवडी