शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चाकण येथे कंपनीतील भंगारासाठी खंडणीची मागणी; तिघांना अटक

By नारायण बडगुजर | Updated: April 5, 2025 19:16 IST

टोळक्‍यावर गुन्‍हा दाखल : तिघांना अटक

पिंपरी : कंपनीतून भंगार घ्‍यायचे असेल तर आम्‍हाला अगोदर पैसे द्यावे लागतील, असे म्‍हणत पाच ते सहा जणांच्‍या टोळक्‍याने खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. चाकण येथे गुरुवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास ही घटना घडली.

रामदास बबन गाडेकर (५०, रा. भोसे, ता. खेड) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ४) चाकण पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. प्रज्वल कैलास मोहिते (२७, रा. मोहितेवाडी, चाकण), संकेत ऊर्फ माँटी नाणेकर (२७, रा. नाणेकरवाडी, चाकण), उसीउल्ला रुबाब खान (३८ रा. कुदळवाडी, चिखली), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्यासह इतर दोन ते तीन संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी रामदास गाडेकर यांच्‍या कंपनीतील सुनील शिवराम राठोड हा व्हिक्टोरीया कंपनीत भंगार माल आणण्यासाठी गेला होता. त्‍यावेळी त्याला व फिर्यादी रामदास यांच्‍या कंपनीचा व्यवस्थापक गौरव पारसमल गादीया यांना संशयित मोहिते व नाणेकर व इतर दोन ते तीन जण व्हिक्टोरीया कंपनीत आले. भंगार माल घेऊन जाण्याचा ठेका आम्हाला मिळाला आहे. तुम्ही भंगार घेऊन जायचे नाही, असे म्‍हणत त्यांनी मोठ्याने शिवीगाळ करून धमकी दिली होती. तसेच गुरुवारी (दि. ३) सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास फिर्यादी रामदास गाडेकर हे लक्ष्मी वजन काटा येथून व्हिक्टोरीया कंपनीत बिल घेण्‍यासाठी जात होते.त्‍यावेळी फिर्यादी रामदास गाडेकर यांच्‍या ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून उसीउल्‍ला खान हा म्‍हणाला की, येथे कोणासही भंगार उचलण्याचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असेल तर आम्हाला अगोदर पैसे द्यावे लागतील. तसेच फिर्यादी रामदास यांच्या ट्रकच्या समोरील काचेवर दगड मारत शिवीगाळ करत संशयित निघून गेले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस