शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला ५२५ कोटींची प्रशासकीय मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 13:58 IST

- ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत दोन वर्षांत पूर्ण होणार प्रकल्प

पिंपरी : इंद्रायणी नदी परिसराचे सुशोभीकरण आणि संवर्धनाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रपुरस्कृत ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत सादर करण्यात आलेल्या इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला राज्य शासनाने ५२५.८२ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता सोमवारी (दि.२७) दिली आहे. शासनाच्या आदेशानुसार हा प्रकल्प २४ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे.

यामध्ये महापालिका हद्दीत दोन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले जाणार आहेत. त्यामध्ये चिखली परिसरात ४० एमएलडी क्षमतेचा, तर दुसरा २० एमएलडी क्षमतेचा इंद्रायणी नदीकाठावर उभारण्यात येणार आहे. याशिवाय वर्षाव पाण्याचे संकलन, नाले वळविण्याची व्यवस्था, इंटरसेप्टर ड्रेन्स, पम्पिंग स्टेशन आणि लायटिंगसह सौंदर्यीकरण यासारखी पूरक कामेही होणार आहेत.

या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रत्येकी २५ टक्के म्हणजेच १३१.४५ कोटी निधी देणार असून, महापालिकेला ५० टक्के म्हणजेच २६२.९१ कोटी रुपये यासाठी खर्च करावे लागणार आहेत. प्रकल्पाची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड महापालिका करणार असून, गुणवत्तेची खातरजमा, निधीचा योग्य वापर आणि वेळेत काम पूर्ण करण्याची जबाबदारी महापालिकेवरच राहील. प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्यास ती महापालिकेलाच उचलावी लागेल. तसेच, कामाचा पहिला टप्पा मंजुरीनंतर ४५ दिवसांच्या आत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. 

इंद्रायणी पुनरुज्जीवन प्रकल्पासंदर्भात याआधी बैठक झाली होती. राज्य शासनाने मंजुरी दिल्याने या प्रकल्पांतर्गत इंद्रायणी नदीकाठ स्वच्छ, आकर्षक आणि पर्यावरणपूरक बनणार असून नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारेल. सरोवरातील गाळ काढणे, किनाऱ्यांचे मजबुतीकरण, दगडी बांधकाम, कंपाउंड फेन्सिंग, लॅण्डस्केपिंग, बागायती तसेच नागरिकांसाठी हिरवळीचे पट्टे आणि विश्रांतीची सोय अशी विविध कामे यात करण्यात येणार आहेत.  - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका  

English
हिंदी सारांश
Web Title : Indrayani River Rejuvenation Project Receives ₹525 Crore Approval

Web Summary : The Indrayani River rejuvenation project, under 'Amrut 2.0', secured ₹525.82 crore approval. Two sewage treatment plants (STP) will be built, along with rainwater harvesting, drainage systems, and beautification. The project is funded by central, state, and municipal corporations, set for completion in 24 months.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड