शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीआय’मध्ये ४० टक्के जागा रिक्त; चौथी फेरीत प्रवेशाची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:29 IST

- निगडी, मोरवाडी आणि कासारवाडीतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्याकडे; विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत मुदत   

पिंपरी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील (आयटीआय) प्रवेशप्रक्रिया अंतिम टप्प्याकडे जात असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातील शासकीय आणि खासगी आयटीआय संस्थांमध्ये अद्याप ४० टक्के जागा रिक्त आहेत. बुधवारपासून (दि. ६) चौथ्या फेरीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना १० ऑगस्टपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

शहरातील निगडी येथील शासकीय आयटीआयमध्ये एकूण ३७२ जागांपैकी तिसऱ्या फेरीअखेर फक्त १६० जागांवरच प्रवेश निश्चित झाले असून २१२ जागा अद्याप रिक्त आहेत. सुमारे ४१ टक्के जागा भरल्या गेलेल्या नाहीत. दरम्यान, रिक्त जागांसाठी विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज करावेत. त्यांना पाचव्या अंतिम फेरीत गुणानुक्रमानुसार रिक्त जागांवर प्रवेशाची संधी मिळणार असल्याची माहिती प्राचार्य शशिकांत साबळे यांनी दिली.महापालिकेच्या मोरवाडी आयटीआयमध्ये सर्वाधिक ५०० जागा असून त्यातील ३३२ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, १६८ जागा म्हणजेच सुमारे ३४ टक्के जागा अजूनही भरायच्या बाकी आहेत. महापालिकेच्या कासारवाडी आयटीआय (महिला) येथे एकूण ११६ पैकी ६१ जागा भरल्या आहेत, तर ५५ जागा रिक्त आहेत, म्हणजेच सुमारे ३९ टक्के जागा शिल्लक आहेत.

पाचवी अंतिम फेरी २८ ऑगस्टपासूनज्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या फेरीपर्यंत प्रवेश मिळालेला नाही, त्यांच्यासाठी चौथी फेरी महत्त्वाची आहे. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी १० ऑगस्टपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्यानंतरही रिक्त जागा राहिल्यास २८ ते ३१ ऑगस्टदरम्यान अंतिम म्हणजे पाचवी समुपदेशन फेरी होणार आहे. या अंतिम फेरीसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता असणार असून, उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणानुक्रमानुसार आणि पसंतीक्रमानुसारच प्रवेश निश्चित केले जाणार आहेत.

आयटीआयमधील अभ्यासक्रमांमुळे केवळ रोजगाराच्या संधीच नव्हे तर आर्थिक स्वावलंबन व उच्च शिक्षणाची वाट खुली होते. विद्यार्थ्यांनी उज्वल भविष्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा.  - शशिकांत पाटील, प्राचार्य, मोरवाडी आयटीआय 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड