पिंपरी : महापालिकेच्या वतीने प्रारूप मतदार यादी जाहीर केली. त्यात गोंधळ झाल्याचा आरोप केला होता. त्यावर शहरातून सर्वच राजकीय पक्षांसह माजी नगरसेवक, पदाधिकारी, इच्छुक तसेच, मतदारांनी जोरदार विरोध आणि टीका केली. मतदार याद्यांमधील गोंधळामुळे दिवसभरात ३२१८ आणि आजअखेर १० हजार २८८ हरकती आल्या आहेत. सुनावणी घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
महपालिका निवडणुकीसाठी महापालिकेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबरला प्रसिद्ध केली. प्रभागातील अनेक मतदारांची नावे काढून आजूबाजूच्या प्रभागात जोडल्या आहेत. त्या प्रकारामुळे राजकीय पदाधिकारी, माजी नगरसेवक, इच्छुक व सामाजिक कार्यकर्ते तसेच, मतदार संताप व्यक्त करीत आहेत.
आंदोलनेही झाली, तीन निवडणुकींमध्ये सर्वाधिक हरकती
मतदार यादीवर सर्वच पक्षांनी आक्षेप नोंदविला. काही माजी नगरसेवकांची नावेही मतदार यादीतून गायब झाली आहेत. महापालिका कर्मचाऱ्यांनी मतदार यादी घोळ करून ठेवल्याने प्रशासनाला रोषास सामोरे जावे लागत आहे. मतदार यादीतील घोळामुळे दररोज मोठ्या संख्येने हरकती दाखल केल्या आहेत. गेल्या तीन निवडणुकींमधील सर्वाधिक सूचना आणि हरकती यावेळी आल्या आहेत.
बुधवारी (दि.३) एका दिवसात एकूण ३२१६ हरकती दाखल केल्या आहेत. मतदार यादी कक्षाकडे एकही हरकती दाखल झाली नाही. ड क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वाधिक ६७१ हरकती दाखल झाल्या आहेत. क क्षेत्रीय कार्यालयाकडे ५८०, ब क्षेत्रीय कार्यालयाकडे ५५३, फ क्षेत्रीय कार्यालयाकडे ५०४ आणि ग क्षेत्रीय कार्यालयाकडे ४०१ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. अ क्षेत्रीय कार्यालयाकडे २२५, ह अ क्षेत्रीय कार्यालयाकडे १६२ आणि ई क्षेत्रीय कार्यालयाकडे १२० हरकती दाखल करण्यात आल्या आहेत.
क्षेत्रीय कार्यालयात सर्वांधिक १० हजार २८८ तक्रारी
आतापर्यंत सर्वाधिक १० हजार २८८ तक्रारी अ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभागांबाबत आहेत. क क्षेत्रीय कार्यालयात २४६१ , फ क्षेत्रीय कार्यालयात १६६८, ड क्षेत्रीय कार्यालयात १४८०, ग क्षेत्रीय कार्यालयात १३४५, ब क्षेत्रीय कार्यालयात १३०६, अ क्षेत्रीय कार्यालयात ८१८ हरकती दाखल झाल्या आहेत. तर, ह क्षेत्रीय कार्यालयात ७८० हरकती, ह क्षेत्रीय कार्यालयातह सर्वात कमी ४३० प्राप्त झाल्या आहेत. गांधीनगर, पिंपरी येथील मतदार यादी कक्षाकडे १४३ हरकती दाखल झाल्या आहेत. दरम्यान, मतदार यादीवर येत्या बुधवार (दि.१०)पर्यंत सुनावणी घेऊन हरकती व सूचना निकाली काढल्या जाणार आहेत.
प्रारूप मतदार यादीवर हरकती
२०१७ - ७७२
२०२२ - ८ हजार ६२०
२०२५ -१० हजार २८८
Web Summary : Pimpri-Chinchwad's draft voter list for municipal elections faces heavy criticism. Errors triggered over 10,000 objections, overwhelming authorities. Discrepancies include misplaced voters and missing names, sparking political outrage.
Web Summary : पिंपरी-चिंचवड नगर निगम चुनाव की मतदाता सूची की भारी आलोचना हो रही है। त्रुटियों के कारण 10,000 से अधिक आपत्तियां दर्ज, अधिकारी परेशान। विसंगतियों में मतदाता सूची से नाम गायब, राजनीतिक आक्रोश।