शहरं
Join us  
Trending Stories
1
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
2
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
3
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
4
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
5
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
6
अजय देवगणच्या अश्लील डीपफेकवर दिल्ली हायकोर्टाचा मोठा आदेश, अभिनेत्यालाही केले सवाल
7
घुसखोरांना मतदानाचा अधिकार द्यायचा का? SIR प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाची महत्वपूर्ण टिप्पणी
8
WPL 2026 Auction : होऊ द्या खर्च! मुंबई इंडियन्सनं Amelia Kerr साठी निम्मी पर्स केली रिकामी
9
याला म्हणतात ढासू शेअर...! 5 वर्षांत 2 रुपयांच्या स्टॉकनं केलं करोडपती, दिला 93806.67% चा बंपर परतावा
10
भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर...
11
वळणावर 'ती' ट्रेन आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चीनमध्ये रेल्वे अपघातात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
12
मिठी मारली, कपाळाचं चुंबन घेतलं अन् गळ्यावर फिरवला...; नववधूला प्रियकरानेच क्रूरपणे संपवले!
13
“१ कोटींची नुकसान भरपाई द्या”; SIR प्रकरणी RSS संबंधित संघटनेची मागणी, ECI आयुक्तांना पत्र
14
“न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही”; नीलम गोऱ्हे यांनी घेतली गौरी पालवे कुटुंबीयांची भेट
15
तुमचा पैसा नाही, सन्मान पाहिजे; दिव्यांगांसाठी विशेष शो करा, सुप्रीम कोर्टाचे समय रैनाला आदेश
16
WPL 2026 Auction : DSP दीप्ती शर्मा ठरली सर्वात महागडी खेळाडू! RTM सह UP वॉरियर्सनं मोजले एवढे कोटी
17
ठाण्याचा तरुण अडकला! दोघांनी रस्त्यात अडवले, वार करत पैसे लुटले; दुसऱ्या दिवशी म्हणाला, "घरच्यांना धडा..."
18
बाजाराची सपाट क्लोजिंग! 'या' कारणामुळे गुंतवणूकदारांचे ५३,००० कोटींचे नुकसान! टॉप गेनर-लूजर्स कोण?
19
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
20
Nagpur Crime: 'लव्ह ट्रॅगल'चा हादरवून टाकणारा शेवट! तेजस्विनीने अमनसोबत ब्रेकअप केलं आणि अमितसोबत...; कशी केली गेली हत्या?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीतील घोळ संपता संपेना;शहरातील तीन लाख ६३ हजार मतदारांचा घर क्रमांकच गायब

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: November 27, 2025 15:07 IST

- प्रारूप मतदारयादीतील घोळ संपता संपेना: महत्त्वाचा तपशीलच नाही; संभ्रम कायम; निवडणूक विभागाकडून राबविण्यात आलेल्या पडताळणी मोहिमेवर प्रश्नचिन्ह; त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी 

पिंपरी -  महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. शहरातील १७लाख १३ हजार ८९१ मतदारांपैकी तब्बल तीन लाख ६३ हजार ९३९ मतदारांचे घरक्रमांकच नोंद झालेले नाहीत, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. मतदार ओळख व मतदान केंद्राशी जोडणारा सर्वांत महत्त्वाचा तपशीलच यादीत नाही. त्यामुळे मतदार याद्यांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

महापालिकेकडून आणि निवडणूक विभागाकडून मागील काही महिन्यांत मतदार पडताळणी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर पत्ते गायब असणे म्हणजे त्या मोहिमांचे परिणाम  कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा अचूक तपशील मिळावा, यासाठी तातडीने पुन्हा पडताळणी करून त्रुटी दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने या चुकांकडे दुर्लक्ष केल्यास मोठ्या प्रमाणावर मतदार वंचित राहण्याची भीती नागरिक व तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रारूप यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती तपासून आवश्यक बदल सुचवावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

कमी मतदानाचा बसणार सर्वच पक्षांना फटका...

मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याने प्रत्येक प्रभागाक कमी मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमी मतदान झाल्यास कोणत्याही एका पक्षाला फायदा होत नाही; उलट सर्वच पक्षांच्या गणितावर परिणाम होऊ शकतो. कारण कमी मतदानात निश्चित मतदास्च बाहेर पडतात. त्यामुळे फक्त पक्षचिन्ह आणि उमेदवारांलाच मतदान होते. त्यामुळे त्याचा फायदा मोठ्या पक्षांनाच होतो.

महाविकास आघाडीसह भाजप, राष्ट्रवादीकडूनही हरकतीप्रशासनाकडून मतदारयादी अद्ययावत केल्याचे दावे केले जात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर घरक्रमांक नसणे ही मोठी चूक आहे. याबाबत शहरातील महाविकास आघाडी तसेच भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पक्षांनीही हरकती घेत तक्रारी नोंदवल्या आहेत.

सोमवारी (दि. २४) आयुक्त श्रावण हर्डीकर यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने व 3 भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी भेट घेतली. चुकीच्या याद्या तयार करण्यामागे निवडणूक विभागाचा ढिसाळपणा नसून भाजपचा अप्रत्यक्षरीत्या हात आहे, अशी टीका विरोधी पक्षांकडून होत आहे.

मतदारयादीतून नावच गहाळ 

 प्रश्न कायम गेल्या काही निवडणुकांत मोठ्या प्रमाणावर मतदार आपले मताधिकार बजावू न शकल्याची तक्रार नोंदवत होते. अनेकांना मतदानाच्या दिवशीच आपले नाव यादीत नसल्याचे समजते, ज्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते. "प्रारूप यादीत चुका दुरुस्त करण्याचा कालावधी लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याने असे होत असल्याचे नागरिकांचे म्हणे आहे.

तब्बल नऊ प्रभागांमध्ये २५ टक्क्यांवर पत्ते गायब 

शहरातील नऊ प्रभागांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे पत्ते गायब आहेत. त्यात प्रभाग २१ मध्ये तब्बल ३३ टक्के मतदारांचे धरक्रमांक नोंद झालेले नाहीत. प्रभाग १० मध्ये २८ टक्के, प्रभाग ३० मध्ये २७ टक्के, तर प्रभाग ४ मध्ये २९ टक्के मतदारांच्या घराचा पत्ता नसल्याचे मतदार यादीतून निदर्शनास आले आहे. तसेच प्रभाग १९, २०, २९, ५ आणि ६ या प्रभागांतही २६ टक्क्यांहून अधिक मतदारांचे पत्ते यादीत नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Voter list chaos: Lakhs missing house numbers in Pimpri Chinchwad.

Web Summary : Pimpri-Chinchwad's voter lists reveal a major flaw: over 3.63 lakh voters lack house numbers. Parties raise concerns over accuracy. Re-verification demanded to prevent voter disenfranchisement. Highlighting potential impact on election outcomes.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक