शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election : महापालिका निवडणुकीसाठी अखेर १२८ जागांसाठी प्रारूप आरक्षण जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 14:14 IST

- राजकीय गणितांमध्ये उलथापालथ होणार : सर्वच पक्षांतील हालचालींना गती; इच्छुकांकडून जुळवाजुळवीला सुरुवात; ‘एससी’साठी २०, ‘एसटी’साठी ३, तर ओबीसींसाठी ३४ जागा राखीव

पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी बहुप्रतीक्षित प्रारूप आरक्षण सोडत मंगळवारी (दि. ११) पार पडली. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, अनेक प्रभागांमध्ये उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झाल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतिम आरक्षण सोडत २ डिसेंबरला होणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात शालेय मुलांच्या हस्ते प्रारूप आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, तृप्ती सांडभोर आदी उपस्थित होते. आरक्षण प्रक्रियेदरम्यान सभागृहात मोठी गर्दी झाली होती. इच्छुक उमेदवार आणि पक्षांचे कार्यकर्ते आरक्षण सोडत पाहण्यासाठी उपस्थित होते. सोडत पारदर्शक पद्धतीने पार पडल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली 

आधी एससी, एसटी त्यानंतर ओबीसीचे आरक्षणमहापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १२८ असून, ३२ प्रभाग आहेत. १२८ पैकी ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे ६४ नगरसेविका आणि ६४ नगरसेवक आहेत. अनुसूचित जातींसाठी (एससी) २०, तर अनुसूचित जमातींसाठी (एसटी) ३ जागा आरक्षित आहेत. ओबीसींसाठी ३४ जागा राखीव आहेत. सोडतीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार आधी एससी, एसटी, ओबीसी आणि त्यानंतर सर्वसाधारण महिला आरक्षण काढण्यात आले.

 अंतिम आरक्षण सोडत २ डिसेंबरला

आरक्षणाचे प्रारूप १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. या प्रारूप आरक्षण सोडतीवर १७ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत हरकती आणि सूचना नोंदविता येणार आहेत. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन पर्यंत हरकती आणि सूचना नोंदविण्याची अंतिम मुदत आहे. हरकती सूचना महापालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय किंवा महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात नोंदविता येणार आहेत. महापालिकेची वेबसाइट, ई-मेल किंवा ऑनलाइन प्राप्त होणाऱ्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका एकूण जागा १२८

वर्ग - एकूण जागा - पुरूष - महिलाअनुसूचित जाती (एससी)-२०-१०-१०

अनुसूचित जमाती (एसटी)- ०३-०१-०२इतर मागास वर्ग (ओबीसी)- ३४-१७-१७

सर्वसाधारण खुला (ओपन)-७१ - ३६ - ३५एकूण- १२८ - ६४ - ६४

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Municipal Corporation announces draft reservation for 128 seats.

Web Summary : The draft reservation for Pimpri-Chinchwad Municipal Corporation elections is out. 128 seats, with 50% reserved for women. SC, ST, and OBC reservations are prioritized. Final list on December 2nd.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक