शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

LPG Gas Crisis : जादा किंमत आणि वेळेच्या कटकटीने सौर चूल दुर्लक्षितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:15 IST

- गॅसटंचाईच्या काळातील शाश्वत ऊर्जेच्या पर्यायांकडे ग्राहकांची पाठ; सोसायटीतील सामायिक गच्चीवर जाऊन सौर चुलीद्वारे जेवण बनवणे व्यावहारिक वाटत नाही

- आकाश झगडे

पिंपरी : घरगुती गॅस सिलिंडरचा विस्कळीत पुरवठा आणि व्यावसायिक सिलिंडरचा थांबलेला पुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा वेळी सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेवर चालणारी सौर चूल पर्याय असतानाही पिंपरी-चिंचवडकरांनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे. सौर चुलीची जादा किंमत आणि वेळखाऊ प्रक्रियेमुळे कोळसा आणि महागड्या विजेच्या इंडक्शनला पसंती मिळत आहे. शाश्वत ऊर्जा देणाऱ्या सौर चुलीला केवळ सूर्यप्रकाशाची आवश्यकता भासते. एकदा गुंतवणूक केली की पुढील कित्येक वर्षे तिचा वापर अन्न शिजवण्यासाठी करता येतो. कडक उन्हाळ्यात पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यप्रकाश भरपूर असतानाही, उपनगरातील छतांवर किंवा गॅलरींमध्ये सौर चुली दिसत नाहीत.

शहरात मोठ्या गृहनिर्माण संस्था आहेत. फ्लॅटमध्ये स्वतःची उघडी जागा मिळत नाही. सामायिक गच्चीवर जाऊन सौर चुलीद्वारे जेवण बनवणे अनेकांना व्यावहारिक वाटत नाही. सौर चुलीवर डाळ-भात किंवा भाजी शिजण्यासाठी साधारण दोन तास लागतात. नोकरदारांना आणि सकाळी लवकर डबा बनवणाऱ्या गृहिणींना इतका वेळ थांबणे परवडत नाही. सौर चुलीवर केवळ वाफेवरचे पदार्थ शिजवता येतात. तळण्यासाठी किंवा चपाती भाजण्यासाठी तिचा उपयोग होत नाही. पावसाळ्यात किंवा आभाळ भरून आल्यावर, रात्रीच्या वेळी जेवण बनवण्यासाठी तिचा वापर करता येत नाही. त्यामुळे नागरिक शाश्वत पर्याय म्हणून तिकडे पाहत नाहीत.

चौकशीसाठी फोन, मात्र प्रत्यक्षात विक्री होत नाही

सौर चुलींच्या चौकशीसाठी विचारणा करण्याचे प्रमाण वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र, विकत घेण्यासाठी कोणी येत नाही. तिच्यामुळे प्रदूषण होत नाही, तरीही सौरी चूल दुर्लक्षित आहे. चांगल्या दर्जाच्या सौर चुलीची किंमत पाच ते आठ हजार रुपयांपर्यंत आहे. त्याऐवजी दोन-तीन हजारांत मिळणारे इंडक्शन घेणे अधिक सोयीचे समजले जाते. इंडक्शन किंवा गॅस एका बटणावर सुरू होतात. सौर चूल मात्र वारंवार सूर्याच्या दिशेनुसार फिरवावी लागते. ते अनेकांना कटकटीचे वाटते.जनजागृती करण्याची गरज

गॅसवरच्या सवयी, जागरूकतेचा अभाव आणि वापरातील मर्यादा यामुळे सौर चुलींचा वापर कमी दिसून येतो. महापालिका व विविध संस्थांकडून जनजागृतीचे प्रयत्न होत असले तरी त्याचा प्रभाव मर्यादित राहिला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढविण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. 

बाजारपेठेतील अंदाजे दर (₹) 

५० ते ६० किलो कोळसा२,५०० ते ४,५०० इलेक्ट्रिक इंडक्शन५,००० ते ८,००० सौर चूल

गॅस टंचाईच्या काळात सौर चुलींच्या चौकशीसाठी फोन येण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, विकत घेण्यासाठी कोणी येत नाही - राजेंद्र पांचाळ, सौर चुलींचे विक्रेते.

English
हिंदी सारांश
Web Title : Despite LPG Crisis, Solar Cookers Ignored Due to Cost, Inconvenience.

Web Summary : Despite LPG shortages, Pimpri-Chinchwad residents avoid solar cookers due to high cost and time-consuming use. Induction cooktops and coal are preferred. Lack of awareness and usability issues hinder adoption.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाई