शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती

By श्रीनिवास नागे | Updated: June 1, 2025 15:36 IST

राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये घुमू लागले शड्डू; अमित शाह यांच्या स्वबळाच्या जोर-बैठकांमुळे डाव-प्रतिडाव सुरू; आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुक पैलवानांकडून वस्तादांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात

- श्रीनिवास नागे 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आखाडा मारण्यासाठी सर्वच पक्षांनी लांग कसली असली तरी खरी कुस्ती महायुतीतच होणार असल्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये घुमणारे शड्डू, अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातील खडाखडी तेच संकेत देत आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वबळाच्या जोर-बैठका सुरू केल्याने येत्या दोन-चार महिन्यांत महायुतीत डाव-प्रतिडाव रंगणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीचा आखाडा सज्ज होऊ लागला आहे. इच्छुक पैलवानांनी आखाड्यात उतरण्यासाठी वस्तादांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली आहे. महायुती एकत्रच लढणार, असे पुकारे काही नेत्यांनी दिले असले तरी, पिंपरी चिंचवडच्या मातीवरची लढत महायुतीतच होणार, असे दिसत आहे. कारण महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार आणि भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात वर्चस्वासाठी शह-काटशह वाढत आहेत. लांडगे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शक्ती असल्याने आणि पवार यांना लांडगेंचे हिशेब पूर्ण करायचे असल्याने हा संघर्ष टोकदार बनला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी सर्वात तुल्यबळ आणि तोड पक्ष असल्याने दोन्ही बाजूंकडून स्वबळाचे शड्डू ठोकले जात आहेत.

भोसरी मतदारसंघातील कामांच्या उद्घाटन-भूमिपूजनासाठी लांडगे नेहमीच फडणवीसांना बोलावतात. त्यांची उठबैस फडणवीसांकडे असते, मात्र ते पवारांकडे जाण्याचे कटाक्षाने टाळतात. शहरातील कार्यक्रमांसाठी पवार येणार असतील तर लांडगे तिकडे पाठ फिरवतात. भाजपचे बडे नेते तेथे उपस्थित असतील, तर त्यांची काहीशी हजेरी असते. मात्र तशा कार्यक्रमात फडणवीसांचा उदोउदो आणि पवारांना अनुल्लेखाने मारणे असे डावपेच मुद्दाम टाकले जातात.

पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्रमावेळी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा वाटा असल्याचे सांगत लांडगे यांनी पवारांचा उल्लेख टाळला होता. पवारांनी तोच धागा पकडून लांडगे यांना माझे नाव घ्यायला का वाईट वाटले, हे मला माहीत नाही. परंतु, ज्याने चांगले काम केले आहे, त्याला चांगले म्हणायला शिका, असे खडे बोल पवारांनी फडणवीस यांच्यासमोरच लांडगे यांना सुनावले होते.जगताप काय करणार?शहरातील भाजपमध्ये महेश लांडगे यांच्यासोबत चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्याही शब्दाला वजन आहे. मात्र विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवार यांनी जगताप यांना मदत केली होती. त्यामुळे जगताप पवारांना विरोध करणार नाहीत, असे बोलले जाते.

मनोमिलन होणार का?केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई-पुणे पट्टयातील महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवारांनी साथीदारांना तशी तयारी करण्यास सांगितले आहे. महायुतीने एकत्र लढण्याचे ठरवले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी विशेषतः अजित पवार आणि महेश लांडगे एकत्र येणार का, वरिष्ठ पातळीवर प्रयत्न झाले तरीही दोघांचे मनोमिलन कसे आणि कितपत होणार? असा सवाल आहेच.

काय आहेत जुने आणि नवे हिशेब...

१ एकत्रित राष्ट्रवादी आणि त्यातही अजित पवार यांच्या इशाऱ्यावरच आमदार लांडगे यांनी सुरुवातीच्या राजकीय कुस्त्या मारल्या. भोसरीचे तत्कालीन आमदार विलास लांडे यांचा विरोध धुडकावून २०१४ मध्ये पवार यांनीच लांडगे यांना महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष केले. त्यादरम्यान बंडाचा झेंडा उंचावून लांडगे यांनी भोसरीतून अपक्षाची लांग बांधून विधानसभेचे मैदान जिंकले. मात्र २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपचा आखाडा जवळ केला. त्यानंतर पवार आणि त्यांच्यातील खडाखडी वाढली.

महापालिका निवडणुकीत 'नको बारामती, नको भानामती, शहरातील निर्णय २ शहरातच' असे फलक लावत त्यांनी पवार यांच्याविरुद्ध दंड थोपटले. पवारांचे एकेकाळचे पैलवान असलेल्या लांडगे आणि दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी पवारांचे महापालिकेतील वर्चस्व संपविले. तेव्हापासून लांडगे आणि पवार यांच्यात विस्तव जात नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असताना पवार यांनी लांडगे यांना 'घुटना' लावण्याचे पुरेपूर प्रयत्न केले.

महायुती सरकारमध्ये पवार सामील झाल्यानंतर लोकसभेवेळी भोसरीतून 3 त्यांच्या उमेदवाराला मदत करण्याऐवजी लांडगे यांनी हात आखडता घेतला. त्यामुळेच पवार यांनी शहरातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाहीरपणे महापालिका स्वतंत्र लढवण्याचे मनसुबे जाहीर केले होते.

अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आल्यानंतर लांडगे यांची कोंडी होऊ लागली. कारण पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कारभारात पवार थेट लक्ष घालू लागले. महापलिकेबाबत बैठका, कार्यक्रमांचे आयोजन करू लागले. लांडगे यांनी त्यांच्यापासून चार हात दूर राहणे पसंत केले. कामांसाठी ते फडणवीसांनाच महत्त्व देऊ लागले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAmit Shahअमित शाहAjit Pawarअजित पवारmahesh landgeमहेश लांडगेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुती