शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

ओला कचरा उचलण्यावरून सोसायट्या आणि ठेकेदारांमध्ये वादावादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 10:42 IST

ओला कचरा उचलण्याचे आदेश असूनही ठेकेदारांकडून अडवणूक, विलगीकरण केलेला कचरा उचलण्यास अडचण नसल्याचे स्पष्टीकरण

पिंपरी : शहरातील गृहानिर्माण संस्थांमधील ओला कचरा तिथेच जिरवण्याच्या आदेशाची पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पुन्हा अंमलबजावणी केली जात आहे. तसेच छोट्या सोसायट्यांकडून ओला कचरा उचलण्याची प्रक्रिया थांबविण्यात येणार असून, त्यांचा कचरा त्यानीच जिरवा, असे काही कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांकडून सोसायट्यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे महापालिका आणि सोसायटीधारकांमध्ये पुन्हा वादावादी होत आहे. दरम्यान, ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिला तर उचलण्यास काहीही अडचण नाही, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ नुसार ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करणे, तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. घर, परिसर, व्यवसाय, आदी ठिकाणी उत्पन्न होणारा ओला, सुका कचरा वेगवेगळा करणे हे कायदेशीर अनिवार्य केले आहे.

सध्या महापालिकेकडून शहराच्या विविध भागातील कचरा गोळा केला जातो. या संदर्भातील परिपत्रक यापूर्वी आयुक्तांनी लागू केले होते. मात्र, गृहनिर्माण संस्थांमधील रहिवासी आणि महापालिका प्रशासन यांच्यात टोकाचा वाद निर्माण झाला होता. लोकांचा विरोध वाढू लागल्याने महापालिकेला हा आदेश मागे घ्यावा लागला. मात्र, तरीही कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांकडून सोसायट्यांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहेत.

ओला कचरा सोसायटीतच जिरवा....सत्तर सदनिका आणि शंभर किलो अथवा त्यापेक्षा अधिक कचरा गोळा होणाऱ्या संस्थांचा ओला कचरा महापालिकेकडून उचलला जाणार नाही. ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे कायदेशीररीत्या बंधनकारक आहे. निर्माण झालेल्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्मिती करून तो जिरवावा, असे कचरा उचलणाऱ्या ठेकेदारांकडून सांगण्यात येत आहे. शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क केला, तेव्हा तो कचरा उचलण्यात आला. - प्रदीप भोळे, रहिवासी, रावेत 

सोसायट्यांनी त्यांचा कचरा त्यांनीच जिरवावा यासाठी महापालिका आग्रही आहे. मात्र, नवीन गृहनिर्माण सोसायट्या तयार होताना त्यांचे भोगवटा प्रमाणपत्र देताना संबंधित विकसकाला महापालिका कचरा जिरविण्यासाठी सक्षम यंत्रणा बसविण्यासाठी का अडवत नाही ? त्यावेळी योग्य ते नियमांचे पालन केले तर भविष्यात होणारा सोसायट्यांचा त्रास वाचेल. - प्राजक्ता रुद्रावार, सदस्य, रावेत-किवळे सोसायटी फेडरेशन

 महापालिका छोट्या सोसायट्या, तसेच बैठी घरे यांचा ओला कचरा उचलत आहे. त्यात फक्त ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करावा, अशी एकमेव अट आहे. त्याचे पालन सोसायटी करीत असेल तर कचरा उचलण्यास काहीही अडचण नाही. - सचिन पवार, सहायक आयुक्त, महापालिका. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे