शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार दारोदारी

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: September 21, 2025 15:36 IST

- पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दोन दिवस : कार्यकर्त्यांच्या घेणार गाठीभेटी

- ज्ञानेश्वर भंडारे

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मैदानात उतरून थेट लोकांपर्यंत पोहोचण्याची रणनीती आखली आहे. शनिवारी (दि.२०) पिंपरी विधानसभेत त्यांनी जनसंवाद घेऊन नागरिकांच्या तातडीच्या समस्या ऐकल्या आणि शासकीय यंत्रणेच्या जोरावर त्वरित उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर पवारांचा ‘परिवार मिलन’ आणि कार्यकर्त्यांच्या घरी भेटीने चर्चांना उधाण आले.अजित पवार यांच्या या थेट संपर्क मोहिमेमुळे पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्ते व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी महापालिका निवडणुकीतील निकालांवर या उपक्रमाचा परिणाम कसा दिसून येतो? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तिन्ही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी...कुठे घरगुती जेवण, कुठे मिसळ-पाव, तर कुठे आइस्क्रीम या माध्यमातून राजकीय सभेपासून दूर जाऊन नागरिकांशी जवळून संवाद साधण्याचा प्रयत्न पवार करत आहेत. चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघांत सलग दोन दिवस पवार घरोघरी भेटी देणार आहेत. गणेशोत्सवादरम्यान ऐनवेळी पवारांचा दौरा रद्द झाल्याने हा परिवार मिलनाचा कार्यक्रम ठेवल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 

जनता दरबार की अप्रत्यक्ष प्रचाराची रणनीती?

अजित पवारांच्या जनता दरबाराने त्यांनी पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात विशेष ‘लक्ष घातल्या’चे चित्र आहे. पालकमंत्री म्हणून त्यांनी आयएएस, आयपीएस दर्जाचे अधिकारी मंचावर बसवले, पण निवडणुकीच्या आधी या ‘जनता दरबारातून’ अप्रत्यक्ष प्रचार सुरू केला असल्याची चर्चा होणे साहजिक आहे. कारण, हे व्यासपीठ सर्वपक्षीय असायला हवे होते; प्रत्यक्षात राष्ट्रवादीचेच नेते होते. 

भाजपच्या वाटेवर असणाऱ्यांच्याच घरी?

उपमुख्यमंत्र्यांनी ‘परिवार मिलन’चा दौरा शहरभरातील कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याचा ठेवला असला, तरीही यामध्ये विशेषत: भाजपच्या वाटेवर असणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी दादा प्रत्यक्ष भेटी देणार आहेत. त्यामुळे या ‘कार्यकर्त्यांचे दादा’ कितपत मन वळवू शकतात, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या माध्यमातून पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी चाचपणी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दादांचे हे प्रयत्न यशस्वी झाल्यास त्यांच्या पक्षांची महापालिकेत पुन्हा सत्ता येण्यासाठी वेळ लागणार नसल्याची चर्चा आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेAjit Pawarअजित पवार