शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा..! विद्यार्थिनीसोबत शिक्षकाने केला लज्जास्पद प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 20:33 IST

बेंद्रे हा पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. त्याने पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आणि शाळेतील तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केले.

पिंपरी : शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गातील १३ वर्षीय विद्यार्थिनी आणि तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी महापालिकेच्या एका संशयीत शिक्षकाला अटक केली. निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ ते १९ जुलै २०२५ या कालावधीत ही घटना घडली. न्यायालयाने संशयित शिक्षकाला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.संतोष हरिभाऊ बेंद्रे (वय ५१, रा. कृष्णानगर, चिखली) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. २३ जुलै) रोजी निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेंद्रे याला अटक करून गुरुवारी (दि. २४ जुलै) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत (दि. २६ जुलै) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष बेंद्रे हा पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहे. त्याने पीडित अल्पवयीन विद्यार्थिनी आणि शाळेतील तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केले. तसेच वॉशरुमला डोकावून पाहून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ७४, ७८, ११५(२), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ७, ८, ९ (एफ), १२, तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी